देवगडात ''नगरोत्थान''ची यादी सदोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात ''नगरोत्थान''ची यादी सदोष
देवगडात ''नगरोत्थान''ची यादी सदोष

देवगडात ''नगरोत्थान''ची यादी सदोष

sakal_logo
By

swt११३.jpg
८६१२३
साक्षी प्रभू

देवगडात ‘नगरोत्थान’ची यादी सदोष
नगराध्यक्षांचा आरोपः नगरविकासकडे आक्षेप नोंदवला
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ः जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान २०२२-२३ अंतर्गत मंजूर झालेली कामांची यादी सदोष असल्याचा संशय व्यक्त केला आहे. काही ठराविक प्रभाग वगळता बाकी प्रभागांमधील कामे मंजुरीसाठी दिलेल्या यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करत याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरविकास शाखा) यांच्याकडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी आवश्यक कार्यवाही करावी; अन्यथा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सादर केलेल्या कामांची यादी परिपूर्ण नसल्याकडे नगराध्यक्षा प्रभू यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजना २०२२-२३ अंतर्गत विकासकामांची यादी नगराध्यक्ष या नात्याने व विषय समिती सभापती यांच्या संमतीने संबंधित कार्यालयाकडे सादर केली होती. जिल्हा प्रशासन कार्यालयाकडून फेरयादी सादर करण्याचे सांगण्यात आले. ही यादी नगराध्यक्षा, विषय समिती सभापती व स्थायी समिती यांना कोणतीही कल्पना न देता तसेच विश्वासात न घेता मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर फेरबदल करून जिल्हा प्रशासन कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मंजुरीसाठी फेर सादर केलेली यादी संशयास्पद आहे. काही ठराविक प्रभाग वगळता बाकी प्रभागांमधील कामे मंजुरीसाठी दिलेल्या यादीतून वगळण्यात आली असून यावर आपला आक्षेप आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचा हा विश्वासघात आहे. या विषयाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर कार्यवाही करावी. मंजूर झालेल्या यादीचा फेरविचार होत नाही, तोपर्यंत मंजूर झालेल्या विकासकामांच्या यादीला स्थगिती मिळावी; अन्यथा १५ मार्चला जिल्हा प्रशासन कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.