उद्योगक्षेत्रात बदल घडवायची ताकद युवकांमध्येच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगक्षेत्रात बदल घडवायची ताकद युवकांमध्येच
उद्योगक्षेत्रात बदल घडवायची ताकद युवकांमध्येच

उद्योगक्षेत्रात बदल घडवायची ताकद युवकांमध्येच

sakal_logo
By

rat०२१२.txt

बातमी क्र.. १२ (टुडे पान २ साठी)
ओळी
- rat२p१४.jpg-
८६३०९
रत्नागिरी ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित युवा संमेलनात बोलताना राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित विद्यार्थी.

उद्योगक्षेत्रात बदल घडवायची ताकद युवकांमध्ये

अंकिता पवार; अभाविपच्या युवा संमेलनाला प्रतिसाद

रत्नागिरी, ता. २ ः विद्यार्थ्यांची शक्ती ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि त्यामुळे उद्योगक्षेत्रात बदल घडवण्याची ताकद ही युवकांमध्येच आहे. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने छात्रशक्ती राष्ट्रशक्ती हा नारा दिला आहे. या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचे काम युवा संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हातर्फे खातू नाट्यमंदिरात आयोजित युवा संमेलनात बोलत होत्या. खातू नाट्यमंदिरात संमेलन झाले. या वेळी अनेक दिग्गज व्याख्याते उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन इन्फिगो केअरचे संस्थापक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. पी कुलकर्णी, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, दक्षिण रत्नागिरी जिल्हा सहप्रमुख प्रा. प्रभात कोकजे, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार, कोकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, विश्वास वाडेकर, अनुष्का राणे, राहुल राजोरिया, प्रसाद जांगले अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. चितळे डेअरीचे प्रमुख विश्वास चितळे, बुकगंगाचे संस्थापक व सीईओ मंदार जोगळेकर, लोकपीठाचे विश्वस्त रूपेश चंदनशिव, गोवा परवरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भूषण भावे हे व्याख्याते उपस्थित होते. या व्याख्यात्यांनी अनुक्रमे कोकणातील उद्योगाच्या संधी, स्टार्टअप् अॅग्रो टुरिझमच्या कोकणातील संधी, लोकशाहीत युवकांची भूमिका आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
-
नवीन शिक्षण प्रणालीचे स्वरूप उलगडले
कार्यक्रमात चितळे यांनी विद्यार्थ्यांना उद्योगात होत असलेली क्रांती समजावली. जोगळेकर यांनी वाचनसंस्कृतीसह स्टार्टअप् विषय समजावला. चंदनशिव यांनी शेतीच्या महत्वाबरोबरच शेतीतही उद्योग करू शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. प्रा. भावे यांनी नवीन शिक्षण प्रणालीचे स्वरूप उलगडून सांगितले.