सिंधुदुर्गनगरीत ''अवकाश दर्शन''

सिंधुदुर्गनगरीत ''अवकाश दर्शन''

सिंधुदुर्गनगरीत
''अवकाश दर्शन''
सिंधुदुर्गनगरीः पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ''अवकाश दर्शन'' कार्यशाळा पोलिस परेड मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी, त्यांचे पाल्य यांना अवकाश व ग्रहांची ओळख व्हावी, टेलिस्कोपव्दारे ते प्रत्यक्ष बघून त्यांची माहिती मिळावी, याकरिता या कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली. उपस्थितांना मार्गदर्शनासाठी खुशी एज्युकेशन सोशल ट्रस्ट, मुंबईचे संदीप बेडेकर, विधिता बेडेकर, दीपक फसाळे या तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. त्यांनी ग्रह, तारे, अवकशातील इतर घडमोडींबाबत माहिती देऊन टेलिस्कोपव्दारे ग्रह, ताऱ्यांचे दर्शन घडविले. या उपक्रमाबाबत पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे सर्वांनी आभार मानले.
................
जागतिक कौशल्य
स्पर्धेसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. २ : जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लिंकवर आपली माहिती भरावी व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी ४६ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ सेक्टरमधून ५० देशातील १०,००० उमेदवार समाविष्ट आहेत. स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यांसाठी आयोजित केली होती.
...............
पेजे महामंडळाच्या
योजनांसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. २ : शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ इतर मागास प्रवर्गातील नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता तसेच व्यवसायामध्ये वाढ करण्याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त लाभार्थींना योजनांचा लाभ देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी केले आहे. जिल्ह्यातील ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर १० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष भेटून अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com