2 करोड भटक्या विमुक्तांना जोडणारे अभिमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 करोड भटक्या विमुक्तांना जोडणारे अभिमान
2 करोड भटक्या विमुक्तांना जोडणारे अभिमान

2 करोड भटक्या विमुक्तांना जोडणारे अभिमान

sakal_logo
By

rat०२४८.txt

बातमी क्र.. ४८ (पान ३ साठी)

rat२p४१.jpg-
८६४६४
रत्नागिरी- विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियानाची माहिती देताना
------------
२ करोड भटक्या विमुक्तांना जोडणारे अभिमान

संजय कदम ; ३५ हजार किलोमीटर मोटरसायकल प्रवास

रत्नागिरी, ता. २ ः विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियानांतर्गत संजय मारूती कदम या तरुणाने भारत देशातील २२ राज्यांना भेटी देऊन १ लाख ३५ हजार किलोमीटर मोटरसायकल प्रवास करत २ करोड भटक्या विमुक्तांना जोडले आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडवत त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती व्यसनमुक्तीचा संदेश एकता प्रबोधन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय हक्क व संविधानिक मागण्या घेऊन रत्नागिरी येथे पोहोचले. त्यांनी ७ जून २०१७ ला पुणे येथून प्रवास सुरू केला. आज रत्नागिरी विमुक्त जाती, भटक्या जमातीने अभियानाचे प्रसारक संजय कदम यांचे जल्लोषात स्वागत केले.

पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी गृह चौकशी अहवाल बनवून जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांना कॅम्प राबवून जातीचे दाखले देण्यात यावे, तांडावस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरीमाला योजना, सीडस् योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींना घरे मिळावीत, महाज्योतीचं सेंटर कोकणामध्ये उभे करावे,आदी मागण्या केल्या.

कदम म्हणाले, भटक्या विमुक्तांचा जन्म कधी नदी, नाल्याकिनारी तर कधी झोपडीवर कधी पालावर झाला. आमचे जन्माचे पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार व जातीचा दाखला नाही तर योजना आरक्षण नोकऱ्या कशा भेटणार? त्यामुळे भारत देशातील ३० करोड भटक्या विमुक्त समाज आजही लँडलेस आणि होमलेस आहे, भटक्या विमुक्त समाजाकडे राहायला घर नाही. त्यामुळे विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी अभियान चालू केले. या अभियानांतर्गत २ करोड भटक्या विमुक्तांची चळवळ उभी राहिली. या अभियानांतर्गत भारत देशातील सगळ्या भटक्या विमुक्त समाजाला जोडले.
--------------
लवकरच दिल्लीत आंदोलन

भटक्या विमुक्तांसाठीच लवकरच दिल्ली येथे १० लाख भटके विमुक्त आंदोलन करणार. १५ दिवसांमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाला कॅम्प राबवून विनाअट जातीचे दाखले नाही दिले तर प्रत्येक जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल,असा इशारा संजय कदम यांनी दिला.