अमोल टाकळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमोल टाकळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अमोल टाकळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमोल टाकळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

rat०३१६.txt

बातमी क्र. .१६ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl३१.jpg ः
८६५७७
चिपळूण ः अमोल टाकळे यांनी मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते राज्य आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले.
--
अमोल टाकळेंना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

चिपळूण, ता. ३ ः तालुक्यातील टेरव येथील सुमन विद्यालयाचे शिक्षक अमोल टाकळे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईत पर्यटन, कौशल्य विकास व महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रसाद लोढा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. टाकळे हे गेली २२ वर्षे विज्ञान आणि गणित या विषयाचे सुमन विद्यालय, टेरव येथे अध्यापन करत आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये १४ वेळा, राज्यस्तरावर ५ वेळा, राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन ३ वेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवलेले आहे. गणित अध्यापक शैक्षणिक साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना राज्यस्तरीय गणित अधिवेशनांमध्ये संबोधित केले आहे. अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांनी अध्यापक शैक्षणिक साहित्यनिर्मितीसाठी पारितोषिके मिळवली आहेत. जिल्ह्यातील ८०० पेक्षा जास्त रक्तदात्यांना एकत्रित करून ब्लडलाईन ग्रुपच्या माध्यमातून तातडीने रक्तदानाची सेवा रुग्णांना मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. ग्रुपच्या माध्यमातून तसेच अन्य सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात व लोकांमध्ये रक्तदानाची चळवळ रूजवण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. टाकळे यांची गेली अनेक वर्षे कोकणातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार या सर्वच क्षेत्रातील मोठ्या कार्यक्रमांचे निवेदक म्हणून कोकणात विशेष ओळख आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.