ग्रामस्थांच्या एकीमुळे करूळ स्वच्छ

ग्रामस्थांच्या एकीमुळे करूळ स्वच्छ

86675
करूळ : येथील स्वच्छता मोहीम उपक्रमात ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तहसीलदार रमेश पवार यांचाही सहभाग होता.


ग्रामस्थांच्या एकीमुळे करूळ स्वच्छ

ग्रामपंचायतीचा पुढाकार; तहसीलदार रमेश पवार यांची उपस्थिती

कणकवली, ता.३ : करूळ (ता.कणकवली) येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली. तहसीलदार आर.जे. पवार यांचाही या मोहिमेत सहभाग होता. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
सरपंच समृद्धी नर यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला. उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे ग्रामसेविका नयना मिठबावकर ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे, परेश कुडतरकर, रिया ढवन, वृषाली चव्हाण, रेश्मा चव्हाण यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पत्रकार गणेश जेठे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, माजी सरपंच बबन कर्णिक, तलाठी मारुती सलाम, आरोग्य सेविका कल्पना ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी निकिता हुले, गोपाळ मेस्त्री हुंबरट सरपंच मनीषा गुरव, हुंबरट ग्रामपंचायत सदस्य मंदा दळवी, पशुधन पर्यवेक्षक दीपक चव्हाण, रेशनिंग दुकान चालक संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन फोपे, मुख्याध्यापक विनिता पाटील, शिक्षिका रश्मी राणे, शिक्षक श्री चोबे, संतोष कर्णिक, अंगणवाडी सेविका हर्षदा सरवणकर, अंकिता तेली पोलिसपाटील गणेश जाधव, हायस्कूलचे शिक्षक विनोद मेस्त्री, कर्मचारी सहदेव जाधव, आशा स्वयंसेविका संपदा कुडतरकर, राधाबाई तेली, अश्विनी नर यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करूळ चव्हाटा येथे या स्वच्छता मोहिमेला शुभारंभ झाला. तर हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या स्मारकाजवळ मोहिमेची समाप्ती झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com