रत्नागिरी-एक हजार 500 लाईनमनबद्दल आज कृतज्ञता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-एक हजार 500 लाईनमनबद्दल आज कृतज्ञता
रत्नागिरी-एक हजार 500 लाईनमनबद्दल आज कृतज्ञता

रत्नागिरी-एक हजार 500 लाईनमनबद्दल आज कृतज्ञता

sakal_logo
By

एक हजार ५०० लाईनमनबद्दल आज कृतज्ञता
४ मार्च लाईनमन दिवस; केंद्र शासनाच्या आस्थापनांना सूचना
रत्नागिरी, ता. ३ : देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने शनिवारी (ता. ४) देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सुचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने येत्या ४ मार्च महावितरणमध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५०० लाईनमनचा सन्मान होणार आहे.
जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवादेतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडलस्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्याहस्ते गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे, अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.

चौकट
जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीजसुरक्षेची शपथ देऊन वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालय प्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील. शिवाय महिला व पुरुष लाईनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ५०० हुन अधिक जनमित्रांप्रती कृतज्ञता सोहळा होणार आहे. सर्व महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून केले आहे.