जिल्ह्यात बहुतांश कामे प्रलंबित

जिल्ह्यात बहुतांश कामे प्रलंबित

जिल्ह्यात बहुतांश कामे प्रलंबित

ब्रिगेडिअर सावंत; राज्य शासनाकडे दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करत त्यांचे लक्ष वेधले.
यावेळी झालेल्या चर्चेत प्राधान्याने नरडवे धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. नरडवे धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून २५ वर्षे पूर्ण झाली तरी प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या समस्या अजून सुटल्या नाहीत. ‘आधी पुनर्वसन, मग धरण’, असे धोरण असताना त्यानुसार कार्यवाही झालेली नाही. २०२४ पर्यंत घळभरणी करण्यासाठी व धरणग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याची विनंती श्री. सावंत मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. शेतकरी पर्यायी शेत जमिनीसाठी मागणी करत आहेत. परंतु, ही यादी अपूर्ण असून बऱ्याच शेतकऱ्यांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत. १९९९ च्या संकलनामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी सतत मागणी करत आहेत. त्यामध्ये अद्याप दुरुस्ती झालेली नाही. निवासी भूखंड वाटपबाबत ग्रामस्थांची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणमधील रहिवाशी संघातर्फे मागणी केलेले भोगवटदारांची जमिन वर्ग १ करणे, भूखंड धारकांना सातबारा देणे, प्राधिकरण क्षेत्रातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, वसाहतीमधील रस्ते, पथदिप, विरंगुळा केंद्र, दिशा दर्शक फलक, उद्यान, दलदल व्यवस्थापन, बस फेऱ्या इत्यादी विकास कामांच्या मागण्याबाबत या चर्चेत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. १९९८ पासून प्राधिकरणमधील रहिवाशी नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. यासाठी ब्रिगे. सावंत राज्याकडून निधीची मागणी करून कामे होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ओरोस हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी बनवली पाहिजे, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
---
देवबागसह इतर विषयावर चर्चा
देवबाग (ता.मालवण) किनाऱ्यावरील जमिनीची धूप होत असल्याने गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यासंबंधी विकास आराखडा बनविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये प्लोटिंग जेटी, देवबाग मुख्य रस्ता रुंदीकरण, समुद्र किनारी बंधारा, त्सुनामी आयलँड, भूमिगत वीज पुरवठा तसेच घावनळे (ता.कुडाळ) गाव जलजीवन योजना आदी विकासकामांची सकारात्मक चर्चा श्री. सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com