
तळकट येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद
86827
तळकट ः रामचंद्र सावंत मित्रमंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. अर्चना घारे यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
तळकट येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद
सावंत मंडळाचा उपक्रम; गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोलझर, ता. ४ ः रामचंद्र सावंत मित्रमंडळातर्फे आयोजित आरोग्य शिबिराला तळकट येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गुणवंतांचा गौरवही करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला संघटना अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या साहेळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात सेवानिवृत्त पोलिस पाटील विष्णू देसाई, क्रिकेटपटू निखिल नाईक, प्रथमेश गावडे, यश मळीक, वैभव नांगरे, शुभम बोंद्रे, आशिष देसाई, अंगणवाडी सेविका सुप्रिया पावसकर, तळकट आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. अम्बापूरकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. चिपळूणकर आदींनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. माजी सरपंच तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष रामचंद्र सावंत मित्रमंडळांने घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी तळकटच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष दीपक मळीक यांचाही विशेष गौरव करण्यात आला. शिवप्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाही गौरविण्यात आले. रामचंद्र सावंत यांनी प्रास्ताविक केले. कुंब्रलचे माजी सरपंच प्रवीण परब यांनी आभार मानले.