तलावांच्या सुशोभिकरणासाठी निधी ः आमदार नीतेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावांच्या सुशोभिकरणासाठी 
निधी ः आमदार नीतेश राणे
तलावांच्या सुशोभिकरणासाठी निधी ः आमदार नीतेश राणे

तलावांच्या सुशोभिकरणासाठी निधी ः आमदार नीतेश राणे

sakal_logo
By

86857
मुंबई : येथील मंत्रालयात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देताना आमदार नीतेश राणे. शेजारी संदेश सावंत, मिलिंद मेस्त्री, समीर प्रभुगावकर, हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी आदी.

तलावांच्या सुशोभिकरणासाठी
निधी ः आमदार नीतेश राणे

पर्यटनमंत्री लोढा यांच्याकडून दखल

कणकवली, ता.४ : तालुक्‍यात पर्यटन वृद्धीसाठी हरकुळ खुर्द, ओसरगाव येथील तलावांच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाकडून निधी प्राप्त होणार असल्‍याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली. श्री.राणे यांनी नुकतीच मंत्रालयात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. त्‍यावेळी श्री.लोढा यांनी निधीची तरतूद करण्याची ग्‍वाही दिल्‍याचे श्री.राणे म्‍हणाले.
किनारपट्टी बरोबरच इतर भागामध्येही पर्यटक यावेत, त्‍या माध्यमातून रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यासाठी कणकवली तालुक्‍यातील हरकुळ खुर्द तसेच महामार्गालगत असलेल्‍या ओसरगाव तलावाच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्‍ध व्हावा. शहरालगतच्या कलमठ कलेश्‍वर उद्यान सुशोभिकरणासाठीही निधी द्यावा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी पर्यटनमंत्री लोढा यांच्याकडे केली. यावेळी हरकुळ खुर्दचे उपसरपंच सर्वेश दळवी, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सोशल मिडिया जिल्‍हाध्यक्ष समीर प्रभूगावकर आदी उपस्थित होते. पर्यटनमंत्री श्री.लोढा यांच्याबरोबर झालेल्‍या चर्चेत तलावांच्या सुशोभिकरणासह पर्यटकांसाठी आवश्‍यक सुविधांची निर्मिती, पर्यटन स्थळांपर्यंत जाण्यासाठी रस्त्यांचीही कामे व्हावीत अशीही मागणी श्री.राणे यांनी केली.