आमदार साळवींच्या घराची पुन्हा एसीबीकडून मोजमाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार साळवींच्या घराची पुन्हा एसीबीकडून मोजमाप
आमदार साळवींच्या घराची पुन्हा एसीबीकडून मोजमाप

आमदार साळवींच्या घराची पुन्हा एसीबीकडून मोजमाप

sakal_logo
By

rat०४३६.txt

बातमी क्र.. ३६ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat४p२७.jpg-
८६९२३
रत्नागिरी ः रायगड एसीबीकडून सुरू असलेल्या आमदार राजन साळवी यांच्या नवीन घराची बांधकाम विभागाकडून मोजमापे घेण्यात आली.
---
आमदार साळवींच्या घराची पुन्हा एसीबीकडून मोजणी

रत्नागिरी, ता. ४ ः ठाकरे गटाचे उपनेते आणि लांजा-राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या नव्या घराचे पुन्हा एसीबीकडून मोजमाप करण्यात आले. वारंवार होणाऱ्या या चौकशीमुळे साळवी कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्‍यांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी आमदार साळवी यांच्या घराची मोजमाप नोंदवून घेतले. याबाबतच अहवाल रायगड एसीबीला पाठवला जाणार आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांच्या पीएससह (स्वीयसायहक) सोबत असणाऱ्या ठेकेदारांचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्‍यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी गेल्या सोमवारी प्रथम तेलीआळी येथील आमदार साळवी यांच्या जुन्या घराची व हॉटेलची मोजमापे घेतली होती. आज पुन्हा एसीबीच्या आदेशावरून त्यांच्या खालचीआळी परिसरातील नव्या घराचीही मापे बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. सुमारे तास ते दीड तास ही प्रक्रिया सुरू होती. याचा अहवाल बांधकाम विभाग एसीबी रायगडला पाठवणार आहे; मात्र या वारंवार होणाऱ्या चौकशीमुळे साळवी कुटुंब हैराण झाले आहे.