सायक्लोथॉनचे विजेते विक्रांत आलेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायक्लोथॉनचे विजेते विक्रांत आलेकर
सायक्लोथॉनचे विजेते विक्रांत आलेकर

सायक्लोथॉनचे विजेते विक्रांत आलेकर

sakal_logo
By

rat०७१८.txt

बातमी क्र.. १८ (टुडे पान २ साठी)

- rat७p१३.jpg-
८७३३०
संगमेश्वर ः रत्नागिरी सायक्लोथॉनचे उद्घाटन करताना श्रीनिवास पेंडसे. सोबत प्रसाद देवस्थळी, युयुत्सु आर्ते, निबंध कानिटकर, सुहास ठाकूरदेसाई आदी तर दुसऱ्या छायाचित्रात विजेते मध्यभागी विक्रांत आलेकर, डावीकडे संतोष शिंदे व उजवीकडे आकाश लकेश्री. (मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)

रत्नागिरी सायक्लोथॉनचे विक्रांत आलेकर विजेते

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजन ; वरिष्ठ गटात कुलकर्णी, तानकर यांचे यश

साडवली, ता. ७ : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वाचे विजेते चिपळूणचे विक्रांत आलेकर ठरले. अवघ्या १ तास ३३ मिनिटात त्यांनी तब्बल ४२ किमीचे अंतर पार करून विजय मिळवला. पुण्यातील आकाश लकेश्री आणि सांगलीतील संतोष शिंदे यांनी फक्त काही सेकंदाच्या फरकाने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. ४० वर्षांवरील गटात अनंत तानकर (गुहागर), मिलिंद खानविलकर (दापोली), डॉ. तेजानंद गणपत्ये (चिपळूण) यांनी आणि महिलांच्या गटात हर्षदा कुलकर्णी, आरती दामले (दोघीही रत्नागिरी) आणि अन्वयी बापट (चिपळूण) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
संगमेश्वर स्टॅंड ते देवळे मार्गावर ही अतिशय दर्जेदार स्पर्धा झाली. देवळे येथे रंग अवधूत महाराजांच्या मठापर्यंत निघालेल्या पेडल फॉर स्पिरिच्यअॅलिटी सायक्लोथॉनमध्ये जिल्ह्यासह महाराष्ट्रातून ८५ जणांनी भाग घेतला. संगमेश्वर एसटी स्टॅंड येथे स्पर्धेचे उद्घाटन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी श्रीफळ वाढवून केले. या प्रसंगी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, निबंध कानिटकर, युयुत्सु आर्ते, सुहास ठाकूरदेसाई यांच्यासह सायकलिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महामार्गावर स्पर्धा संपल्यानंतर देवळे गावात सायकलस्वार गेले. त्या वेळी कानडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावात सर्व सायकलस्वारांची वाजतगाजत मिरवणूक काढली. या वातावरणाने अवघे देवळे गाव सायकलमय झाले. बक्षीस वितरण समारंभ रंग अवधूत महाराज मठाच्या आवारात करण्यात आला. या वेळी नीलेश कोळवणकर, अॅड. प्रफुल्ल साळवी, गजानन काळोखे, उदय लोध, कौस्तुभ सावंत, सदाशिव करकरे, नामदेव सरपोतदार, वासुदेव सरदेसाई, मोघे गुरूजी, दिलीप लिंगायत, राजेंद्र मावळणकर, सरदेसाई, सुबोध करकरे, प्रबोध आठल्ये, युयुत्सु आर्ते, प्रमोद हर्डीकर, महेंद्र चाळके, रंजना कदम, भाई भोसले, अण्णा बेर्डे आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी हॉटेल श्रद्धा धामणी, गोळवली गोशाळा प्रकल्प, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, राज मंडप डेकोरेटर्स, लायन्स क्लब रत्नागिरी, लायन्स क्लब संगमेश्वर, ओम प्रमोद ज्वेलर्स, आकार ऑर्गनायझेशन, कोकण प्रॉपर्टी एक्स्पो खामकर, प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई, जिल्हा शासकीय रुग्णालय, संगमेश्वर व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र, युयुत्सु आर्ते, नीलेश चव्हाण, देवळे ग्रामपंचायत, गावप्रमुख, ग्रामस्थ यांचा समावेश होता.

पाणी, फळांसह रुग्णवाहिकेची सुविधा
सायकल गौरव पुरस्कार प्राप्त विनायक वैद्य यांनी सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेत सर्वांना प्रोत्साहन दिले. दरवर्षीप्रमाणे दापोलीच्या प्रशांत पालवणकर यांनी गिअर सायकलिस्टना टक्कर देत नॉनगिअर सायकलने हे अंतर पार केले. या स्पर्धेत चार हायड्रेशन पॉईंट ठेवले होते. तिथे पाणी व एनर्जी ड्रिंक, केळी, चिक्कीचे वितरण कार्यकर्त्यांनी केले. रूग्णवाहिका, सपोर्ट व्हेईकलची सुविधा उपलब्ध होती.