नेरुरला आज मांड उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुरला आज 
मांड उत्सव
नेरुरला आज मांड उत्सव

नेरुरला आज मांड उत्सव

sakal_logo
By

जिल्ह्यामध्ये
मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी : शिमगोत्सच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून ६ ते २० मार्च या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी होळी उत्सवात देवस्थानाचे धार्मिक कार्य करण्याच्या मानापानावरून दोन गटांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. तसेच १० ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) साजरी होणार आहे. त्यामुळे या कालावधीसाठी जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केले आहेत.
--
सातोसेत आज
विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः सातोसे येथे महिला ग्रुप, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त उद्या (ता. ८) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २.३० वाजता रांगोळी स्पर्धा, ३ वाजता १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा, तर ५ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. ६ वाजता देऊळवाडी महिला ग्रुपचा फुगड्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सातोसे गावच्या स्नुषा सुषमा मांजरेकर यांचा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. सरपंच प्रतीक्षा मांजरेकर यांनी ही माहिती दिली.
--
नेरुरला आज
मांड उत्सव
कुडाळ ः नेरुर-साईचे टेंब येथील मेस्त्री आणि मडवळ समाजातर्फे शिमगोत्सवानिमित्त प्रसिद्ध मांड उत्सव उद्या (ता. ८) रात्री १० वाजता आयोजित केला आहे. यानिमित्त गावडे समाजाचे पारंपरिक रोंबाट वाजत-गाजत स्वयंभू देव कलेश्वराच्या भेटीला येणार असून देव कलेश्वराच्या मंदिरात भेटीचा नारळ ठेवून गार्‍हाणी घातल्यानंतर हे रोंबाट परतीच्या प्रवासाला निघेल. त्यावेळी नेरुर साईचे टेंब येथे या रोंबाटाच्या स्वागतासाठी मेस्त्री-मडवळ समाज पौराणिक कथासारावर आधारीत आकर्षक व चित्तथरारक देखावे सादर करणार आहे. कलाप्रेमी रसिकांसाठी हा शिमगोत्सवातील मांड उत्सव जणू पर्वणीच ठरतो.
----------------
तरंदळेत आज
नेत्र चिकित्सा
कुडाळ ः तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्या वतीने महिलादिनाचे औचित्य साधून उद्या (ता. ८) सकाळी दहाला तरंदळे शाळा नंबर १ येथे लहान मुलांपासून ते महिला व पुरुष आणि खास करून वयोवृध्द रहिवासांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.