शिमगोत्सव साजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिमगोत्सव साजर
शिमगोत्सव साजर

शिमगोत्सव साजर

sakal_logo
By

rat०७१३.TXT

बातमी क्र.. १३ (टुडे ३ साठी)

निरूळच्या श्री देव सांब देवस्थानचा
शिमगोत्सव साजरा

पावस ः येथील निरूळ गावच्या श्री देव सांब देवस्थानच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या गावात भक्तांची घरे घेतली जात नाहीत तर पालखी सहाणेवर बसवण्यात येते. सहाणेवरचे सर्व कार्यक्रम करण्याची वर्षानुवर्षे परंपरा आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
पावस परिसरात प्रत्येक गावांमध्ये शिमगोत्सव काळात देवाला रूपं लागल्यानंतर पालखीत बसवतात. या काळामध्ये गावातील प्रत्येक घरामध्ये पालखीमधून देव भक्तांच्या भेटीला जातो. मागील दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे पालखी घरोघरी नेण्यास बंदी होती. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पालखी सहाणेवरच बसून ठेवण्यात आली होती. तेथेच भक्तगण दर्शन घेत होते. निरूळ गाव मोठे असूनही गेली अनेक वर्ष श्रीदेव सांब या शंकरच्या देवस्थानची पालखी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करत आहेत. यंदाही पालखी सहाणेवर असून गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी एकत्रितपणे सहाणेवर येतात. त्यामुळे या उत्सवात कोणतेही वाद झालेले नाहीत. प्रत्येकाने सहाणेवरच यायचे आणि नतमस्तक व्हायचे ही परंपरा आजही कायम आहे. या गावातील गावकर व मानकरी यांच्या समन्वयाने प्रत्येक उत्सव साजरा केला जातो.
--

rat७p१६.jpg ः
८७३३७
साडवली ः जी-२० परिषदेत सहभागी होणारे विद्यार्थी पायल व स्वरूप दोरखडे.

स्वरूप व पायल दोरखडे करणार जिल्ह्याचे नेतृत्व


साडवली ः १० व ११ मार्चला सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जी-२० मधील २० प्रमुख देशांतील युवक व युवती मते मांडण्यासाठी सहभागी होत आहेत. आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरूखचे स्वरूप दोरखडे व पायल दोरखडे हे दोन विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाविद्यालयात पायल व स्वरूप हे प्रथम वर्ष, विज्ञानवर्गात शिकत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व ''युथ- २०प्रोग्रेस''च्या संयोजक प्रा. डॉ. वर्षा फाटक यांच्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय परिषदेत निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी या विद्यार्थ्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
--

- rat७p४.jpg-
८७३२३
प्रा. गणेश दिवे

प्रा. गणेश दिवेंना डॉक्टरेट पदवी प्राप्त

गुहागर ः वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागातील प्रा. गणेश दिवे यांना विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विषयातील Fantasy & Satire in the Select Novels of Terry Pratchett : A Study हा संशोधन प्रबंध त्यांनी सादर केला होता. त्यांनी टेरी प्रॅचेट या ब्रिटिश लेखकाच्या डिस्कवर्ल्ड कादंबरीच्या मालिकेतील काल्पनिक घटक व उपहासाबाबत अभ्यास करून दोन शोधनिबंधसुद्धा प्रकाशित केले. या संशोधनातून काल्पनिक कथा, कादंबऱ्यांच्या वाचकांना प्रेरणा मिळेल. लेखक काल्पनिक घटकांचा वापर करून समाजप्रबोधन कसे करतो याचे आकलन होईल. या संशोधनासाठी डॉ. दिवे यांना राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, रूकडी येथील प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, सर्व विभागातील विभागप्रमुख व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

--

- rat७p६.jpg-
८७३२५
राजेंद्र आरेकर
- rat७p७.jpg-
८७३२६
विजय मोहिते

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

गुहागर ः गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खेड येथे झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात प्रवेश केला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची खेड येथे पहिलीच सभा पार पडली. राज्यात ठाकरे यांना सोडून पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात असताना गुहागर मतदार संघात मात्र उलटे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेले जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष लतिफ लालू, गुहागर विधानसभा सेक्रेटरी जगदीश गडदे, तवसाळ राष्ट्रवादी गावकमिटी अध्यक्ष रमेश कुरटे, काताळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नम्रता निवाते, चंद्रकांत निवाते, प्रकाश घाणेकर, प्रकाश पाडदले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी विजय नाचरे आदींनी ठाकरे गटात प्रवेश केला. येत्या काळात आमदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गट अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला.

-
rat७p२३.jpg ः
८७३४४
पावस ः पावस येथील नवलादेवी व गोळप येथील श्री देव रवळनाथ या भावंडांची पावस बाजारपेठेतील परशुराम मंदिराजवळ झालेली भेट.

श्री देव रवळनाथ, नवलादेवी पालख्यांची भेट

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील ग्रामदेवता नवलादेवी व गोळप येथील श्री देव रवळनाथ या भावंडांच्या भेटीला दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे या पालखी भेटीला काही निर्बंध घातल्यामुळे भाविकांचा उत्साह कमी होता; परंतु यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे पावस बाजारपेठेतील परशुराम मंदिराजवळ श्री देव रवळनाथ व नवलादेवी या दोन पालख्यांची भेट सालाबादप्रमाणे झाली. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही पालखी भेट झाली; मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी ही भेट लवकर घेण्यात आली कारण, मागील वर्षी होळी नेताना सहाणेवर झालेल्या अपघातामुळे यावर्षी नवलादेवी देवस्थानच्या विश्वस्तांना या उत्सवानिमित्त काही बंधने घालण्यात आली आहेत. पालखी भेट व होळी या दोन्ही गोष्टी रात्री उशिरापर्यंत चालत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने अडचणीचे ठरत असल्याने या वेळी या सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.