
सिंधुदुर्गात बारापैकी नऊ गावठाणांच्या सनदा तयार
सिंधुदुर्गात बारापैकी नऊ
गावठाणांच्या सनदा तयार
८६३ सनदांना ४ लाख ८२ हजाराचे शुल्क
ओरोस, ता. ७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमापन केलेल्या बारा गावठाण गावांपैकी नऊ गावांच्या सनदा तयार करण्यात आल्या आहेत. एकूण ८३६ सनदा तयार करण्यात आल्या असून यासाठी ४ लाख ८२ हजार ३३८ एवढे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यातील १ लाख २० हजार ५३३ एवढे शुल्क जमा झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट, अणाव, वझरे, मोर्ले, फणसवडे, गेळे, कलंबिस्त, मासुरे, तोरसोळे, धालवली, लिंगडाळ आणि किंजवडे या बारा गावांचे गावठाण भूमापन पूर्ण झाले आहे. ड्रोन फ्लाईंगद्वारे भूमोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गावांना सनद देण्यात येणार आहे. या सनदा वाटप करताना शासनाने शुल्क आकारण्यास सांगितले आहे. यातील पाट, अणाव, वझरे, मोर्ले, फणसवडे, गेळे, कलंबिस्त, मासुरे या आठ गावांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर तोरसोळे, धालवली, लिंगडाळ आणि किंजवडे या चार गावांचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नाही. शुल्क निश्चित केलेल्या आठ गावांची सनद तथा मिळकतपत्र देण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे भूमोजणी केलेल्या १२ गावठाण गावांच्या एकूण ८३६ सनदा तयार करण्यात आल्या आहेत. यातील आठ गावांच्या सनदांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एकूण ४ लाख ८२ हजार ३३८ एवढे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ १०४ सनदांचे वाटप पूर्ण झाले आहे. अद्याप ७३२ सनदा वाटप शिल्लक आहे. वाटप केलेल्या सनदांमधून १ लाख २० हजार ५३३ एवढे शुल्क वसूल करण्यात आले आहे. अजून ३ लाख ६१ हजार ८०५ एवढे शुल्क वसुली शिल्लक राहिली आहे. यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.
...........
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण बारा गावांचे गावठाण भूमापनाचे काम झाले आहे. त्याप्रमाणे मिळकत पत्रिका व सनदा तयार झालेल्या आहेत. सनदा आवश्यकता फी भरून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सनद फी वसुलीसाठी तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडून गाव पातळीवर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गावठाण भूमापन झालेल्या मिळकतधारकांनी आपापली सनद घेऊन त्याची होणारी फी भूमिअभिलेख कार्यालयाकडे जमा करावी.
- डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख
...............
स्थिती अशी...
गाव*सनद संख्या*सनद वाटप*शिल्लक*सनद शुल्क*वसुली*शिल्लक
पाट*२६*७*१९*१६२५५*४७३५*११५२०
अणाव*३७*०*३७*११४६८५*०*११४६८५
वझरे*१२*०*१२*९०६०*०*९०६०
फणसवडे*४५*४५*०*३३७५७*३३७५७*०
गेळे*५२*५२*०*६६१९६*६६१९६*०
कलंबिस्त*१७*०*१७*१५८४५*०*१५८४५
मासुरे*१०५*०*१०५*५०८५०*०*५०८५०
तोरसोळे*१०८*०*१०८*०*०*०
चालवली*९४*०*९४*०*०*०
लिंगडाळ*९०*०*९०*०*०*०
किंजवडे*११२*०*११२*०*०*०