रत्नागिरी ः निवोशीतील पाणीयोजना महिला बचतगटांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः निवोशीतील पाणीयोजना महिला बचतगटांकडे
रत्नागिरी ः निवोशीतील पाणीयोजना महिला बचतगटांकडे

रत्नागिरी ः निवोशीतील पाणीयोजना महिला बचतगटांकडे

sakal_logo
By

- rat७p१२.jpg- KOP२३L८७३२० लांजा ः तालुक्यातील निवोशी ग्रामपंचातीमार्फत नळपाणी योजना देखभालीसाठी महिला बचतगटाकडे सुपूर्द करण्यात आली.

निवोशीतील पाणीयोजना महिला बचतगटांकडे
जिल्हा परिषदेचा निर्णय ; देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी
रत्नागिरी, ता. ७ ः जागतिक महिलादिनानिमित्त जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महिला बचतगटाकडे देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर निवोशी (ता. लांजा) येथील योजना क्रांती उत्पादक महिला बचतगटाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या इतिहासातील असा पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. पाण्याचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यात हर घर नलसे जल हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. जलजीवनमधून जिल्ह्यात ७०० कोटी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५६ गावे हर घर नलसे नल म्हणून जाहीर करण्यासाठी सज्ज आहेत. स्वच्छ सुजल शक्ती सन्मान योजनेंतर्गत इंदवटी महसूल गावातील निवोशी (ता. लांजा) हे हर घर नलसें जल म्हणून सरपंच विनोद गुरव यांनी विशेष ग्रामसभेत घोषित केले आहे. या गावातील योजना क्रांती उत्पादक महिला बचतगटाकडे पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी बचतगटाने स्वयंप्रेरणेने स्वीकारली आहे.
महाराष्ट्र जीवनोन्नती (उमेद) अभियानातून या बचतगटांची नोंदणी झाली आहे. या गटात १७ महिला कार्यरत आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रकल्प संचालक एन. डी. घाणेकर, प्रकल्प संचालक राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

चौकट
ही आहेत बचतगटाची कामे
बचतगटाने योजनेची १०० टक्के पाणीपट्टी वसूल करणे, स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करणे, नियमित पाण्याची माहिती देणे, रासायनिक व जैविक तपासणी करणे, किरकोळ दुरुस्ती ही कुशल-अकुशल मनुष्यबळाकडून करवून घेणे यासारखी कामे करण्याबाबतचा ठराव करण्यात आला.