दाभोलीत ४०० काजू कलमे खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोलीत ४०० काजू कलमे खाक
दाभोलीत ४०० काजू कलमे खाक

दाभोलीत ४०० काजू कलमे खाक

sakal_logo
By

87558
दाभोली ः येथे लागलेली आग विझविताना अग्निशमन बंब.

दाभोलीत ४०० काजू कलमे खाक
वेंगुर्ले ः दाभोली-गोलतवाडी (ता.वेंगुर्ले) येथे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या जलबांदेश्वर ठिकाणच्या शेजारी आज दुपारी १२ नंतर अचानक आग लागली. ही आग पूर्ण डोंगरात पसरून डोंगराच्या माथ्याला पवनचक्कीच्या ठिकाणापर्यंत गेल्याने या डोंगरावरील सुमारे ४०० काजू कलमे जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. अचानक आग लागल्याने ग्रामस्थांची एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी काही प्रमाणात आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र संपूर्ण जंगल भाग असल्याने त्यांना अपयश आले. सायंकाळी ६ नंतर सावंतवाडी येथील अग्निशमन बंब डोंगराच्या माथ्याला दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली. याबाबतची माहिती दाभोली पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर यांनी दिली.