तळेरे शाळेत महिलादिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे शाळेत महिलादिन उत्साहात
तळेरे शाळेत महिलादिन उत्साहात

तळेरे शाळेत महिलादिन उत्साहात

sakal_logo
By

87772
तळेरे ः शाळा क्र. १ येथे महिलादिनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले.


तळेरे शाळेत महिलादिन उत्साहात
तळेरे : येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देशातील पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका पद्मजा करंदीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका व शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
...............
चौकुळला उद्या शिवजयंती उत्सव
सावंतवाडी ः शिवगर्जना प्रतिष्ठान, चौकुळ यांच्यावतीने भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. १०) श्री देवी सातेरी मंदिर नजीक केले आहे. यानिमित्त पहाटे ५ वाजता किल्ले पारगड येथून शिवज्योत मिरवणूक, त्यानंतर सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवप्रतिमा पूजन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.