कणकवलीत ११ला तबलावादन प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत ११ला तबलावादन प्रशिक्षण
कणकवलीत ११ला तबलावादन प्रशिक्षण

कणकवलीत ११ला तबलावादन प्रशिक्षण

sakal_logo
By

कणकवलीत ११ला तबलावादन प्रशिक्षण
कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्रात ११ मार्च रोजी तबला वादन प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. सकाळी दहाला या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पंडित डॉ. समीर दुबळे उपस्थित राहणार आहेत.
तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य चारुदत्त फडके हे तबला वादनाचे प्रशिक्षण देणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते सायंकाळी पाचपर्यंत हे तबला वादन प्रशिक्षण मोफत असणार आहे. यासाठी सोबत तबला जोड असण्याची गरज आहे. तर सायंकाळी चारुदत्त फडके यांचे तबला एकल वादन असणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी प्रतिष्‍ठानच्या सीमा कोरगावकर यांच्याशी साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.