
मालवण येथील शिबिरात 40 जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
८७८८८
मालवण येथील शिबिरात
४० जणांचे उत्स्फूर्त रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : जागतिक महिलादिन व येथील स्वराज्य महिला समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला महिलांसह पुरुष रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन मालवणच्या पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व डॉ. शिल्पा झाट्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुकाध्यक्ष शिल्पा खोत, लायन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, प्रा. सुमेधा नाईक, जयश्री हडकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, पल्लवी तारी-खानोलकर, आर्या गावकर, निनाक्षी शिंदे-मेतर, निकिता तोडणकर, शांती तोंडवळकर, कल्पिता जोशी, साक्षी मयेकर, मानसी घाडीगावकर, दीपा पवार, दिया पवार, स्वाती तांडेल, तन्वी भगत आदी उपस्थित होत्या. महिलादिनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. पुरुष रक्तदात्यांनी देखील रक्तदान करत सहकार्य केले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिम्मीली, रक्तपेढी तंत्रज्ञ श्री. ओगले व मयुरी शिंदे, वाहचालक नितीन गावकर, मदतनीस सुरेश डोंगरे यांचे सहकार्य लाभले.