
''आय स्पार्क 2023'' मध्ये दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग
rat०९२०.TXT
बातमी क्र. २० (टुडे २ साठी)
फोटो आहे
- rat९p६.jpg-
८७८४९
''आय स्पार्क २०२३'' मधील उपक्रमांची पाहणी करताना रविंद्र माने यांच्यासह अन्य
''आय स्पार्क २०२३'' उपक्रमाचे आयोजन
माने अभियांत्रिकी विद्यालय ः स्पर्धांसह शैक्षणिक साहित्याचेही वाटप
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ९ ः आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात “आय स्पार्क २०२३” हा उपक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या कॉम्पुटर विभागातील असोसिअशन ऑफ कॉम्पुटर इंजिनीरिंग (एस) संघटनेने हा उपक्रम घेतला. विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, वेब डिझायनिंग, चित्रकला, प्रश्नमंजुषा, नकाशा भरणे यासारख्या आकर्षक स्पर्धांमध्ये जवळची महाविद्यालये व शाळातून जवळपास दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
“आय स्पार्क २०२३” उपक्रमात राजेंद्र माने पॉलिटेक्नीक, राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसहित मीनाताई ठाकरे विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल, आश्रमशाळा निवे, लोक विद्यालय तुळसनी, माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरीच्या शालेय विद्यार्थ्यासाठीही स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. संस्थाध्यक्ष रविंद्र माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक तसेच अन्य महाविद्यालय व शाळामधून आलले प्राध्यापक, स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, वेब डिझायनिंग, चित्रकला, प्रश्नमंजुषा, नकाशा भरणे यासारख्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जवळची महाविद्यालये व शाळा यामधून जवळपास दीडशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यातील नकाशा भरणे स्पर्धेत मीनाताई ठाकरे विद्यालयाची निधी सावंत, चित्रकला स्पर्धेत माने इंटरनॅशनल स्कूलची नारायणी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विज्ञान प्रकल्प प्रदर्शन मध्ये पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे शुभम महाडिक आणि संकल्प अंकुशराव तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत माने इंटरनॅशनल स्कूलचे अभिराज कांबळे आणि अर्श काझी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर शब्दकोडे स्पर्धेत मीनाताई ठाकरे विद्यालयाची नुपूर भुरवणे, वेब डिझायनिंग स्पर्धेत राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या मनोज गोठणकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. या उपक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. समारोप प्रसंगी सर्व विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. लक्ष्मण नाईक तसेच अन्य मान्यवराच्या हस्ते प्रशस्तीपत्रके व पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यशाळेसाठी एस संघटनेच्या प्रमुख प्रा. मानसी गोरे, विद्यार्थी प्रमुख तेजस सुतार तसेच विभागीय प्राध्यापक व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.