
जिल्हा पोलिस दलाकडुन महिलांचा अनोखा सन्मान
फोटो-
rat९p१७.jpg- KOP२३L८७९१७ रत्नागिरी - गुन्ह्यांमध्ये सरकार पक्षाची बाजू भक्कम मांडणाऱ्या चार महिला सरकारी वकीलांचा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
rat९p५.jpg-KOP२३L८७८४६ महिलांच्या विविध गु्न्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत गुन्ह्यांची उकल करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस दलातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी.
---------------
जिल्हा पोलिसांकडून महिलांचा अनोखा सन्मान
जागतिक महिला दिन; गुन्हे उकल करण्यास मदत करणारे वकील, पोलिसांचा समावेश
रत्नागिरी, ता. ९ : पोलिस दलाकडुन न्यायालयात दखल केलेल्या विविध खटल्यांमध्ये गुन्हे शाबीत करण्यासाठी कायदेविषयक सहाय्य पुरविणाऱ्या सरकारी वकील आणि महिला संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करून त्याची उकल करून मुद्देमाल हस्तगत आणि नष्ट करण्यात महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा पोलिस दलाने काल आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
जागतिक महिला दिन बुधवारी (ता. ८) साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथील "मंथन या सभागृहामध्ये पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा झाला. जिल्हा पोलिस दलाने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या विविध खटल्यांमध्य गु्न्हे शाबीत करण्यासाठी कायदेविषयक सहाय्य पुरविणाऱ्या तसेच सरकारी पक्षाची बाजू उत्तमरित्या मांडुन न्यायालयासमोर गुन्हे शाबीतीचे प्रमाण वाढविण्यास मोलाचे सरकार्य करणाऱ्या ४ महिला वकीलांचे महिलादिनी गौरव करण्यात आला. श्रीमती मेघना नलावडे विशेष सरकारी अभियोक्ता, वर्षा प्रभु सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, प्रज्ञा तिवरेकर, विशेष सहा. सरकारी अभियोक्ता आणि विधिज्ञ प्रिया लोवलेकर (सदस्य,जिल्हा बाल कल्याण समिती ) यांचा शाल-श्रीफळ, गुलाबाचे रोप व प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलिस अधिकारी, अमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हामध्ये दाखल असणाऱ्या महिलांसंदर्भातील विविध गुन्ह्यांची उकल व तपास करण्यात मुद्देमाल हस्तगत करण्यात, आरोपी पकडण्यात गुन्हे शाबीत क मिळालेले गावठी बॉम्ब नष्ट करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा शाल श्रीफळ, गुलाबाचे रोप व प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये वैशाली अडकुर (स.पो.नि. निरीक्षक शहर पोलिस ठाणे) तेजस्वीनी पाटील (स.पो.नि. लांजा) प्राप्ती मंचेकर (स.पो.लि., बी.डी.डी.एम. रत्नागिरी), गायत्री पाटील (पोउनी महिला सुरक्षा कक्ष), मुक्ता भोसले (पोउनी शहर पोलिस), शीतल पाटील, पोऊनि, नियंत्रण कक्ष), क्रांती पाटील (पोउनि जयगड), पूजा चव्हाण (पोऊनि रत्नागिरी ग्रामीण), सुप्रिया मोरे ( चिपळूण) यांचा सत्कार करण्यात आला.
कोट...
महिला व बालकांसंबंधी गुन्ह्याच्या तपासदरम्यान अत्यंत संवेदनशीलतेने व सदहृदयतेने हातळणेबाबत सूचना दिल्या व रत्नागिरी जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणेबाबत आवाहन केले.
-धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी