rat0921.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rat0921.txt
rat0921.txt

rat0921.txt

sakal_logo
By

फोटो
- rat९p७.jpg- KOP२३L८७८५०
साखरपा : गोडे यांचा राजू, अन्य दोन बाहुल्यांबरोबर गोडे आणि गोडे यांनी केलेला कॉम मॅनचा बाहुला


कॉमन मॅनला प्रथम बोलका करणारा कलाकार

भडकंब्याचे के एस गोडे ; ३५० प्रयोग, ४६० बोलक्या बाहुल्या
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता ९ : शब्दभ्रम ही एक दुर्मिळ कला आहे. ती कला जोपासत लीमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारे मूळचे भडकंबा येथील कलाकार म्हणजे कृष्णाजी श्रीराम गोडे. त्यांनी आतापर्यंत ४६० बाहुल्या तयार केल्या असून ३५० प्रयोग केले आहेत.
जेमतेम अकरावी मॅट्रिक नंतर गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये असताना केतकर नावाच्या एका मित्राकडून गोडे यांनी जादूची ओळख करून घेतली. त्या काळात गाजत असलेल्या चंदू दी ग्रेट या जादूगाराकडून जादूचे पुढील ज्ञान आत्मसात करून त्यांच्याबरोबर पन्नास प्रयोग गोडे यांनी केले. त्या दरम्यान गोडे यांना बोलक्या बाहुल्यांनी आकर्षित केले. बोलक्या बाहुल्या या केवळ इंग्लंडमध्येच तयार होत असत. जादूगार चंदू १९८७ साली इंग्लंडला गेले असताना गोडे यांनी त्यांच्यामार्फत पहिली बाहुली डेव्हनपोर्ट इथून ८५० रुपयांचे कर्ज काढून विकत घेतली. क्लोड केनी हा कलाकार त्यांचा मित्र होता. त्याचा अँडी या बाहुल्यावरून गोडे यांनी स्वत:च्या बाहुल्याची मापे तयार करून त्याच वर्षी स्वत:चा पहिला बोलका बाहुला तयार केला. आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन हा गाजला होता. त्या अर्कचित्राने गोडे प्रभावित झाले आणि प्रयत्नपूर्वक कॉमन मॅनचा मुखवटा तयार केला. इतकेच नाही तर कॉमन मॅनच्या या बाहुल्याला आवाज दिला. लक्ष्मण यांच्या अर्कचित्रात कायम अबोल राहिलेल्या कॉमन मॅनला प्रथम आवाज दिला तो गोडे यांनी.
डेव्ह मिलर या व्यंग चित्रकाराशी गोडे यांचा संपर्क झाला आणि मिलरच्या सहाय्याने आपल्या बाहुल्यांमध्ये सुधारणा केली. प्रारंभी केवळ तीन हालचाली असलेल्या बाहुल्यात त्यांनी सात ते आठ हालचाली तयार केल्या. गोडे यांच्या या कामाची दखल घेत नॉर्थ अमेरिका असोसिएशन ऑफ व्हेंट्रीलॉकिस्ट संस्थेने त्यांना सभासद करून घेतले. संस्थेच्या न्यूज ईव्हेंट या द्वै मासिकात गोडे यांच्या सगळ्या बाहुल्यांचे फोटो प्रसिद्ध केले. मॅजेस्टिक प्रकाशनाकडून शब्दभ्रम शास्त्र आणि कला हे पुस्तक १९८३ साली प्रसिद्ध करण्यात आले. गोडे यांनी तयार केलेला एक बाहुला सिनसिनाटी येथील व्हेंट हेव्हन मुझियममध्ये मानाने ठेवण्यात आला आहे. लीमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या बाहुल्यांची नोंद १९९७ साली करण्यात आली आहे. तसेच त्यांना २००४ साले लाईफ टाइम अचिव्हमेंट सन्मानही देण्यात आला आहे.

---
कोट
शब्दभ्रम ही एक कला आहे. आपल्या तोंडाच्या हालचाली न करता बाहुल्याचे संवाद काढावे लागतात. सध्या ही कला दुर्मिळ होत चालली आहे. ह्या कलेत कलाकार निर्माण व्हायला हवेत.
- के. एस- गोडे, शब्दभ्रम कलाकार

------

दृष्टिक्षेपात
* ४६० बाहुल्या तयार, ३५० प्रयोग
* स्वत:चा राजू हा बाहुला घेऊन प्रयोग
* लीमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान
* कॉमन मॅन बोलका बाहुल्याला आर के लक्ष्मणांची दाद