उध्दव ठाकरे गट पदाधिकारी नियुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उध्दव ठाकरे गट पदाधिकारी नियुक्त
उध्दव ठाकरे गट पदाधिकारी नियुक्त

उध्दव ठाकरे गट पदाधिकारी नियुक्त

sakal_logo
By

उध्दव ठाकरे गट पदाधिकारी नियुक्त
कुडाळः उद्भव ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत, अशी माहिती उद्भव ठाकरे गट मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सचिव खासदार विनायक राऊत यांनी कळविले आहे. सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे (कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्हा), बाळा गावडे (जिल्हाप्रमुख), संदेश पारकर (सावंतवाडी विधानसभा जिल्हाप्रमुख), संजय पडते (कुडाळ विधानसभा जिल्हाप्रमुख), सतीश सावंत (कणकवली विधानसभा संघटक), श्रेया परब (कुडाळ विधानसभा तालुका संघटक), लक्ष्मण रावराणे (वैभववाडी) यांना नियुक्ती देण्यात आली.
................
महिला खेळाडूंना आवाहन
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून त्याकरिता मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या व साहसी उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंची माहिती संबंधित कामगिरीच्या प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे १३ मार्चपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्राच्या २० फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार १० ते २५ मार्च या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत.
..............
स्थानिक सुट्या जाहीर
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील महसुली हद्दीमध्ये असलेल्या शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून २०२३ या वर्षाकरिता ३० ऑगस्ट (रक्षाबंधन), १८ सप्टेंबर (हरितालिका) आणि १० नोव्हेंबर (धनत्रयोदशी, दिवाळी) याप्रमाणे स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
................
मत्स्य व्यवसाय योजनेसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्य व्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवयाच्या योजनांकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. २०२२-२३ अंतर्गत प्राप्त प्रस्तावांची तपासणी, छाननी व प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास सादर करणे यासाठी अवधी लागणार असल्याने सिंधुरत्न समृद्ध २०२२-२३ अंतर्गत प्रस्ताव १५ मार्चपर्यंत सादर करावेत. योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव कार्यक्षेत्रातील परवाना अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता. मालवण) रत्नाकर राजम यांनी केले आहे.
................