वैभववाडीत महिला स्टॉलधारकांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत महिला स्टॉलधारकांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
वैभववाडीत महिला स्टॉलधारकांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

वैभववाडीत महिला स्टॉलधारकांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

sakal_logo
By

वैभववाडीत महिला स्टॉलधारकांचे
उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः मुख्याधिकारी आणि स्टॉलधारकांमधील चर्चा निष्फळ ठरल्यामुळे वैभववाडीतील महिला स्टॉलधारकांनी कालपासून सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. त्यामुळे स्टॉलधारकांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या जागेवरच स्टॉल लावण्यात यावेत, अशी स्टॉलधारकांची मागणी आहे.
शहरात शासकीय जमीन, नगरपंचायत मालकीच्या रस्त्यावर असलेले स्टॉल नगरपंचायतीने हटविले. या स्टॉल हटाव मोहिमेविरोधात कालपासून (ता. 8) तहसील कार्यालयासमोर महिला स्टॉल संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. काल दिवसभर कुणीही अधिकारी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी फिरकला नव्हता. रात्री उशिरा मुख्याधिकारी सूरज कांबळे हे चर्चेसाठी तेथे गेले. पर्यायी जागेसंदर्भात विचारविनिमय सुरू असून उपोषण स्थगित करावे, अशी विनंती त्यांनी स्टॉलधारकांकडे केली, परंतु स्टॉल पूर्वीच्या जागेवर होते त्या स्थितीत ठेवण्यात यावेत, नंतरच उपोषण स्थगित करण्यात येईल, अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलांनी घेतली. मुख्याधिकारी आणि स्टॉलधारकांमधील चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही स्टॉलधारक महिलांनी उपोषण सुरू ठेवले. सायकांळी उशिरापर्यंत कुणीही चर्चेसाठी आलेले नव्हते. रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.