सैतवडे एसटी बस सेवा पूर्ववत करा

सैतवडे एसटी बस सेवा पूर्ववत करा

rat1015.TXT

बातमी क्र. 15 (टुडे पान 2 साठी, मेन)

(एसटीचे चित्र वापरावे)
88145
फोटो ओळी
- rat10p6.jpg-
88087
रत्नागिरी ः सैतवडे ग्रामस्थ एसटी अधिकाऱ्यांना निवेदन देताना

रत्नागिरी- सैतवडे एसटी बस सेवा पूर्ववत करा

ग्रामस्थांचे निवेदन ः एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 10 : कोरोना काळात सैतवडे गुंबद पेठ मोहल्लापर्यंत येणाऱ्या सर्व एसटी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करा असे निवेदन सैतवडे ग्रामस्थांनी एसटीचे अधिकारी राकेश पवार यांच्याकडे दिले.
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गाव हे महसूल गाव म्हणून ओळखले जाते. या गावातून गुहागर तालुक्यातील पडवे, कुडली या भागातील लोक कामानिमित्त सैतवडे गावात येणाऱ्या एसटी गाड्यांवर अवलंबून असतात. हा परीसर मच्छीमारांसाठी ओळखला जातो. त्यामुळे एसटी बस या भागातील लोकांची जीवन वाहिनी आहे. पण कोरोना काळात सैतवडे गुंबद पेठ मोहल्लापर्यंत येणाऱ्या सर्व एसटी गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही गाड्या पुर्ववत झाल्या. परंतु रत्नागिरी आगारातून दुपारी 12 वाजता व 3 वाजता सुटणारी गाडी ही सैतवडे पोस्टापर्यंत येऊन तिथूनच परत जाते. गुंबद पेठ मोहल्लापर्यंत ही गाडी येत नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही एसटी गाडी पोस्टाजवळून न जाता पुढे पेठ मोहल्लापर्यंत नेण्यात यावी, तसेच सैतवडे गावामध्ये वस्तीची गाडी उपलब्ध करून द्यावी. वाहक व चालक यांची राहण्याची पाण्याची व्यवस्था गुंबद ग्रामपंचायतमार्फत करण्यात येणार आहे. याबाबत निवेदन सैतवडे गावचे माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला व सामाजिक कार्यकर्ते अजीज मुकादम यांनी रत्नागिरी येथील एसटी विभागीय कार्यालयामध्ये वाहतूक अधिकारी राकेश पवार, एटीआय समीर काळे यांना निवेदन देऊन संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली.

सेवा पुर्ववत सुरू करण्याचे आश्वासन
सैतवडे गावासाठी लवकरच एसटी बस सुरू करून पेठ मोहल्लापर्यंत जाण्यासाठी वाहक चालकांना सूचना देणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com