प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी
प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी

प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी

sakal_logo
By

88124
आचरा ः महिला दिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धेत प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी ठरल्या.


प्रणाली कावले पैठणीच्या मानकरी

आचऱ्यातील होममिनिस्टर; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा, ता. १० ः श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी प्रणाली कावले, तर सोन्याच्या नथीच्या मानकरी जानकी तावडे ठरल्या. दिलीप सावंत (हुद्देदार) यांच्या स्मरणार्थ नंदकिशोर ऊर्फ आबा सावंत (हुद्देदार) यांनी बक्षिसे प्रायोजित केली.
संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी संस्थेचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह उर्मिला सांबारी, अशोक कांबळी, भिकाजी कदम, दिपाली कावले, ॲड सायली आचरेकर, सौ. गुरव आदी उपस्थित होते. ही स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. पहिल्या फेरीपासून अनुक्रमे उर्मिला सांबारी, सई राणे (कुलसूम नर्सरी, आचरा ), स्मिता परब, नीलेश वालकर (सावित्री जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स, आचरा) वैशाली सांबारी, शोभा सुखटणकर, गीता खेडेकर, सीमा घुटुकडे, सुमित्रा गुरव, यशोधन गवस, रचना जोशी यांनी बक्षिसे प्रायोजित केली होती. सर्वच्या सर्व ३२ स्पर्धकांना नेहा नलावडे, नेहा घाडी, प्रतिभा मयेकर यांनी बक्षिसे प्रायोजित केली. तसेच सर्व स्पर्धकांना व सर्व उपस्थित महिला वर्गाला रमाकांत आचरेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आकर्षक भेटवस्तू दिली. उपस्थित सर्व महिलांना सरपंच प्रणया टेमकर, अँड. सायली आचरेकर, प्रज्ञा पेडणेकर यांच्याकडून अल्पोपहार दिला. उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. त्यांना मानसी राणे यांच्याकडून फुलझाडे भेट देण्यात आली. विनिता कांबळी व मधुरा माणगावकर यांनी सूत्रसंचालन केले. समृद्धी मेस्त्री, महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, कामिनी ढेकणे, वर्षा सांबारी, वीणा ढेकणे, रुपेश साटम, श्रद्धा महाजनी यांनी विशेष परिश्रम घेतले.