
प्रा. राजाराम परब यांना शिक्षणमहर्षी पुरस्कार
88375
पुणे : शिक्षणमहर्षी गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते प्रा.राजाराम परब यांचा गौरव केला.
प्रा. राजाराम परब यांना
शिक्षणमहर्षी पुरस्कार
कुडाळ, ता. ११ ः शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत प्रा. राजाराम परब यांचा मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड-पुणे, दक्ष फाउंडेशन महाराष्ट्र आणि तेजस्विनी संस्था सातारा यांनी पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, गोमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदींच्या हस्ते शिक्षण महर्षी म्हणून गौरव केला.
सर्वसामान्य कुटुंबातील प्रा. परब यांनी आयआयटीमध्ये उच्च पदवी मिळवण्यापर्यंतचा केलेला प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी एरोनॉटिकल क्षेत्रामध्ये पदवी, उच्च पदवी आणि पीएच.डी प्राप्त केली आहे. यामध्ये शैक्षणिक प्रवासात आयआयटी मद्रास येथे केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. केवळ स्वतः उच्चशिक्षित होऊन चालणार नाही, तर आपल्याप्रमाणे ज्या-ज्या विद्यार्थ्यांना समस्या आहेत, त्यांचे डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न त्यांनी अंगीकारले. श्री. परब यांनी विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट अॅकॅडमी नावाची संस्था सुरू केली. तीही आपल्या मातृभूमीपासून दूर हजारो मैल असलेल्या चेन्नईसारख्या शहरात. अत्यंत खडतर परिश्रमाने त्यांनी या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले. २०१८ मध्ये त्यांनी कुडाळ येथे परफेक्ट अॅकॅडमी सुरू केली आणि सिंधुदुर्गात राहून विद्यार्थ्यांना अशक्य वाटणारे निकाल मिळवून दाखविले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या कामाची दखल मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड पुणे, दक्ष फाउंडेशन महाराष्ट्र, आणि तेजस्विनी संस्था सातारा यांनी घेऊन त्यांचा पद्मश्री डॉ. प्रभुणे, गोमाता ब्रिगेडच्या देसाई आदींच्या हस्ते शिक्षण महर्षी म्हणून गौरव केला.