सावंतवाडी-लाखे वस्तीत विहीर बांधकामास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी-लाखे वस्तीत
विहीर बांधकामास प्रारंभ
सावंतवाडी-लाखे वस्तीत विहीर बांधकामास प्रारंभ

सावंतवाडी-लाखे वस्तीत विहीर बांधकामास प्रारंभ

sakal_logo
By

88396
सावंतवाडी ः नवीन विहिरीच्या बांधकामाचा प्रारंभ करताना पदाधिकारी.

सावंतवाडी-लाखे वस्तीत
विहीर बांधकामास प्रारंभ
सावंतवाडी, ता. ११ ः येथील लाखे वस्तीसाठी आमदार निधीतून मंजूर झालेल्या नवीन विहिरीच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली. त्यामुळे आता वस्तीतील लोकांना चांगले पाणी मिळणार आहे. या कामाचा प्रारंभ माजी नगरसेविका दीपाली सावंत, बाबू कुडतरकर, नीलिमा चलवादी, परशुराम चलवादी, मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे, रघुनाथ लाखे, कृष्णा लाखे यांच्या उपस्थितीत झाला. लाखे वस्तीतील विहीर बरीच वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे नवीन विहिरीसाठीचा प्रस्ताव समाजाच्यावतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दिला होता. त्यांनी यावर तातडीने कार्यवाही करत नवीन विहीर बांधणीसाठी निधी मंजूर करून घेतला. चार ते पाच वर्षे विहिरीचे पाणी गढूळ राहत असल्यामुळे ते पिण्यायोग्य नव्हते. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा; परंतु आता नवीन विहीर बांधणीला सुरुवात केल्यामुळे लाखे समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या नवीन विहीर बांधणीसाठीच्या पाठपुराव्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे लाखे वस्ती शाखाप्रमुख अमित लाखे यांनी समाजाच्या वतीने आभार मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपक लाखे, रघुनाथ लाखे, कृष्णा लाखे व समाजातील नागरिक उपस्थित होते.