‘नेत्रावती’ला प्रायोगिक थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नेत्रावती’ला प्रायोगिक थांबा
‘नेत्रावती’ला प्रायोगिक थांबा

‘नेत्रावती’ला प्रायोगिक थांबा

sakal_logo
By

‘नेत्रावती’ला प्रायोगिक थांबा
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या व सिंधुदुर्गातील कुडाळ स्थानकावर थांबा असणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसला आता भटकळ स्थानकावरही थांबा देण्यात येणार आहे. हा थांबा सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर असणार आहे. त्यानुसार नेत्रावती (१६३४५) भटकळ स्थानकावर नॉन मॉन्सून कालावधीत रात्री १.२० ला पोहोचून १.२२ ला सुटणार आहे. मॉन्सून कालावधीत रात्री अडीचला पोहोचून २.३४ ला सुटणार आहे. थिरुवनंतपूरम एलटीटी (१६३४६) भटकळ स्थानकावर नॉन मॉन्सून कालावधीत रात्री १.४०ला पोहोचून १.४२ ला सुटणार आहे. मॉन्सून कालावधीत रात्री १२.४४ ला पोहोचून १२.४६ ला सुटणार आहे.
---------------
वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई
वैभववाडी ः विनापरवाना व ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍या चार वाहनांवर येथील महसूल विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करीत ३ लाख १२ हजार ९१२ रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई काल (ता. १०) पहाटे शहरातील संभाजी चौकात करण्यात आली. वैभववाडी शहरातील संभाजी चौकात येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार संकेत यमगर, तलाठी श्री. लोणकर, श्री. बागल, राजेंद्र चरापले यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांची तपासणी केली होती.