गाबीत समाजाची देवगडमध्ये आज सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाबीत समाजाची देवगडमध्ये आज सभा
गाबीत समाजाची देवगडमध्ये आज सभा

गाबीत समाजाची देवगडमध्ये आज सभा

sakal_logo
By

गाबीत समाजाची देवगडमध्ये आज सभा
देवगड, ता. ११ ः एप्रिलमध्ये होणाऱ्या गाबीत समाज महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील तालुका गाबीत समाज बांधवांची महत्त्वाची सभा उद्या (ता. १२) सकाळी अकराला शिक्षक भवन सभागृहात होणार असल्याची माहिती गाबीत समाजाचे परशुराम उपरकर यांनी येथे दिली.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होण्याचा एप्रिलमध्ये २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. याअनुषंगाने गाबीत समाज बांधवांच्यावतीने २७ ते ३० एप्रिल दरम्यान मालवण येथे महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि गोवा राज्यातील समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने गाबीत समाजातील विविध स्तरातील बांधवांशी संयुक्त चर्चा करण्यासाठी उद्या येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परशुराम उपरकर, चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.