रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही
रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही

रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही

sakal_logo
By

88462
कणकवली : येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयातील वैद्यकीय सेवेचा आढावा आमदार नीतेश राणे यांनी घेतला. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही

नीतेश राणे ः कणकवली येथे आरोग्यसेवेचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ ः येथील उपजिल्हा रुग्णालयात कणकवली तालुक्यासह देवगड, कुडाळ, वैभववाडी तालुक्यातूनही रुग्ण येतात. यात कुठल्याही रुग्णांची हेळसांड आम्ही खपवून घेणार नाही. रुग्णांवर इथेच उपचार करा, बाहेर पाठवू नका. आरोग्याच्या बाबतीत बेशिस्तपणा आणि रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज दिला.
आमदार राणे यांनी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून तेथील वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी. एस. नागरगोजे, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, अण्णा कोदे, डॉ. चौगुले व इतर उपस्थित होते
आमदार राणे म्हणाले, "उपजिल्हा रुग्णालयाबाबत ज्या काही समस्या असतील, त्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना समक्ष बसवून सोडवल्या जातील; मात्र जे डॉक्टर रुग्ण सेवा देण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. प्रत्येक पेशंट बाहेर हलवावा लागतो, हे आता बंद झाले पाहिजे. रुग्णालयातील फोन बंद आहे. डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत माहिती फलक नाही. ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित नाही. ऑर्डर दिलेले डॉक्टर हजर नाहीत. असाच सारा कारभार असेल तर गप्प बसणार नाही. हे सारे काम दर्जाहीन सुरू आहे. यात तातडीने बदल व्हायला हवा.’’
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागरगोजे म्हणाले, ‘‘डॉक्टरांची रिक्तपदे तातडीने भरली जात आहेत. तर वर्ग ४ च्या पदांबाबतची भरती शासनाकडून सुरू आहे. तोपर्यंत आऊटसोर्सिंग माध्यमातून रुग्णालय स्वच्छता आणि इतर कामे सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालय १०० बेडचे असून दोनच लिपिक आहेत. ही पदे भरण्याबाबत उपसंचालकांना कळविण्यात आले आहे. फार्मासिस्टची तीन पदे मंजूर आहेत; मात्र एकच कार्यरत आहे. त्याबाबतही आम्ही उपसंचालकांना कळविले आहे.’’