विलवडेच्या विकासासाठी ५० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलवडेच्या विकासासाठी ५० लाख
विलवडेच्या विकासासाठी ५० लाख

विलवडेच्या विकासासाठी ५० लाख

sakal_logo
By

88542
विलवडे ः मधलीवाडी रस्त्याचे भूमिपूजन करताना माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे. शेजारी सरपंच प्रकाश दळवी आदी.

विलवडेच्या विकासासाठी ५० लाख

संदिप गावडे ः सरपंच दळवींचे प्रयत्न कौतुकास्पद

बांदा, ता. १२ ः कृषीप्रधान विलवडे गावात विविध विकास कामांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी सरपंच प्रकाश दळवी यांनी तात्काळ कागदपत्रांची पूर्तता केली. सरपंच दळवी यांनी दोन महिन्य‍ात केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी येथे काढले.
विलवडे-मधलीवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे श्री. गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्री. गावडे बोलत होते. या रस्त्यासाठी विशेष अनुदानातून ७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा वार्षिक याजनेतून विलवडे नं. १ शाळा दुरुस्ती करणे (५ लाख), वरची वाडी शाळा दुरुस्ती करणे (५ लाख), विलवडे वरची वाडी रस्ता मजबुतीकरण (१० लाख), विलवडे धनगरवाडी साकव (१५ लाख) आदी कामे मंजूर असून लवकरच सर्व कामांचे भुमिपुजन कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासासाठी आम्ही नियमित कार्यरत राहू. गाव विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. गावडे यांनी यावेळी दिली. यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी सरपंच मोहन दळवी, उपसरपंच विनायक दळवी, ग्रामपंचायत सदस्या सानिका दळवी, अपर्णा दळवी, शिल्पा धर्णे, गणेश दळवी, प्रदिप दळवी, सागर देऊलकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष दळवी, परेश धर्णे, आत्माराम दळवी, ठेकेदार जीवन केसरकर आदी उपस्थित होते.