खेड-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-संक्षिप्त
खेड-संक्षिप्त

खेड-संक्षिप्त

sakal_logo
By

पान 5 साठी, संक्षिप्त)

खेड तालुका मराठा सेवा संघ कार्यकारिणीची सभा
खेड : तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारिणीची सभा राजर्षी शाहू महाराज सभागृहात सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा भवनाच्या दुसऱ्या मजल्याला खेड पालिकेकडून अधिकृत परवानगी मिळाल्याचे सभागृहात सूचित केले. या वेळी विश्वासराव शिंदे, अॅड. प्रवीण शिंदे, प्रभाकर सुर्वे, सत्यवान उतेकर, तुकाराम आंब्रे, मंगेश भोसले, जयवंत चव्हाण आदी उपस्थित होते.


ज्ञानदीपमध्ये गडकिल्ले संवर्धनवर कार्यशाळा
खेड ः ज्ञानदीप महाविद्यालयात गडकिल्ले संवर्धन व संरक्षण या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. गडसंवर्धन समितीचे कोकण विभाग सदस्य प्रवीण कदम उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले तसेच त्यावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू यांना अनन्यसाधारण महत्व आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपणे त्याचे संरक्षण करणे आजच्या आधुनिक काळात खूप गरजेचे झाले आहे. याचे संरक्षण व संवर्धन हे आजच्या तरुण पिढीच्या हातात असून त्यांनी पुढाकार घेऊन ते जपायचे आहे असा संदेश प्रवीण कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी किल्ल्यावर असणारे दीपस्तंभ, भुयारे किंवा भुयारी मार्ग, वीरगळ, शिलालेख, ऐतिहासिक इमारती, मंदिरे तसेच इतिहासाची साक्ष देणाऱ्या इतर सर्व वास्तूंचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे असून याबरोबरच गडकिल्ल्यांचे मॅपिंग होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रवीण कदम यांचा सत्कार प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आला.


रोहिणी कदम रायफल्स निमलष्करी दलात
खेड ः तालुक्यातील माणी-देऊळवाडी येथील रहिवाशी व लवेल येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी रोहिणी कदम आसाम येथील रायफल्स निमलष्करी दलात दाखल झाली आहे. तिने 2018 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडी परीक्षा दिली होती. मैदानी स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीतही उत्तीर्ण झाली. कोरोनाच्या संकटामुळे ती दलात दाखल होवू शकली नव्हती. अखेर तिला दाखल होण्याचे रितसर पत्र आल्याने ती निमलष्करी दलात सामील झाली आहे. या निवडीमुळे तिचे कौतुक होत आहे.