जिल्ह्यात सव्वादोनशे हेक्टरवर नुकसानीची अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात सव्वादोनशे हेक्टरवर नुकसानीची अंदाज
जिल्ह्यात सव्वादोनशे हेक्टरवर नुकसानीची अंदाज

जिल्ह्यात सव्वादोनशे हेक्टरवर नुकसानीची अंदाज

sakal_logo
By

पान १ साठी

सव्वादोनशे हेक्टरवर नुकसानीचा अंदाज
जिल्ह्यात वेगवान वारे, उष्मा व अवकाळीचा फटका; फळगळीने बागायतदार त्रस्त
रत्नागिरी, ता. १२ ः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदललेल्या वातावरणाने आणि काही भागात झालेल्या अवकाळी पावसाने कोकणात पाच जिल्ह्यांत सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात सव्वादोनशे हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वेगवान वारे आणि उष्मा यामुळे फळगळीने बागायतदार त्रस्त झाले आहेत.
गेल्या दहा दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर प्रतिकूल परिणाम होत असून, फळ भाजण्यासह गळून जात आहेत. अवकाळी पाऊस आणि अवेळी पावसाने आधीच आंबा-काजू बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित कोलमडले असताना आता तापमान वाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांमध्ये आहे. रोजच्या तापमानात वाढ होत असल्याचा परिणाम कोकणातील आंबा, काजू पिकावर होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीमध्ये तयार फळे दिसत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागांमधील बागांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. उशिरा मोहोर, तुडतुड्यांचे जास्त प्रमाण, प्रतिकूल हवामान अशा स्थितीतही तयार झालेला आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून औषध फवारणीसह मशागती आणि कामगारांसाठीचा खर्च भागविणे मुश्किल झाले आहे.
काही दिवसांपूर्वी सकाळच्या सत्रात वेगवान वारे वाहत होते. त्यामध्येही फळ गळ झाली होती. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे कोकणातील बागायतीवर परिणाम झाला आहे. शासनाकडेही भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार कोकणातील पाचही जिल्ह्यांत प्राथमिक स्तरावर करण्यात आलेल्या पाहणीत कोकणात सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागायतीची हानी झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यापैकी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कोकणातील ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांना बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २९२ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अद्याप केवळ प्राथमिकस्तरावर पंचनाम्याची कार्यवाही सुरू असल्याने भरपाईबाबत संदिग्धता वर्तविण्यात येत आहे.


नुकसान हेक्टरमध्ये
जिल्हा नुकसान
* ठाणे १२३०
* पालघर २०१७
* रायगड १४७
* रत्नागिरी २२५
* सिंधुदुर्ग ४३