
गडेकर, हरमलकर यांची नियुक्ती
88686
दोडामार्ग ः चेतना गडेकर, शीतल हरमलकर यांना नियुक्तिपत्र देताना दीपक केसरकर. शेजारी रवींद्र फाटक.
गडेकर, हरमलकर यांची नियुक्ती
दोडामार्ग ः तालुका शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी चेतना गडेकर यांची, तर दोडामार्ग शहर महिला प्रमुखपदी शीतल हरमलकर यांची नियुक्ती करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व लोकसभा मतदारसंघ प्रमुख रवींद्र फाटक यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, कार्यकर्ते राजू निंबाळकर, प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, सानवी गवस, रामदास मेस्त्री, संदीप गवस, दयानंद धाऊसकर, गुरू सावंत आदी उपस्थित होते.
...........
देवगड तालुक्यात रंगपंचमी उत्साहात
देवगड ः तालुक्यात ठिकठिकाणी रविवारी (ता. १२) रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. बच्चेकंपनी उत्साहात न्हाऊन निघाली होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने उत्साहाला उधाण आले होते. महिलांनीही रंगपंचमीचा आनंद घेतला. होळी उत्सवातील रंगपंचमी हा उत्साहाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस मानला जातो. रविवार असल्याने बाजारपेठ बंद होती. दुपारनंतर शहरात रंगपंचमी उत्साहाला सुरुवात झाली. बच्चेकंपनीने रंगपंचमीचा आनंद घेतला. तरुणाईही यात रंगून गेली होती. महिलांनी दुपारनंतर रंगपंचमी खेळण्यासाठी सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत रंगपंचमीचा उत्साह कायम होता. विविध ठिकठिकाणी मंदिरातील होळी उत्सवाच्या ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. तालुक्यात सर्वत्र उत्साही वातावरण होते.