अवघ्या दोन तासात साकारले व्यक्तिचित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या दोन तासात साकारले व्यक्तिचित्र
अवघ्या दोन तासात साकारले व्यक्तिचित्र

अवघ्या दोन तासात साकारले व्यक्तिचित्र

sakal_logo
By

swt135.jpg
88764
कुडाळः येथे कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करताना ज्येष्ठ कलावंत जयवंत नाईक. (छायाचित्र ः अजय सावंत)

अवघ्या दोन तासात साकारले व्यक्तिचित्र
कॅनव्हासवर कलाकृतीः कुडाळातील कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. 13 ः येथील चित्रकार रजनीकांत कदम यांनी आयोजित केलेल्या व्यक्तिचित्र कार्यशाळेमध्ये जेष्ठ कलावंत जयवंत नाईक उर्फ चौ यांचे व्यक्तिचित्र चित्रकार किरण हणमशेठ यांनी अवघ्या दोन तासात कॅनव्हासवर साकारले. ही कार्यशाळा येथील श्री. कदम यांनी आयोजित केली होती. याला चित्रकला, मूर्तिकार अशा कलावंतांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
श्री. कदम यांनी श्री गणेश स्वामी आर्ट सेंटर यांच्या माध्यमातून कला महर्षी (कै.) के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य चित्रकार किरण हणमशेठ यांची व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा येथील एमआयडीसी येथे आयोजित केली होती. याला चित्रकला, मूर्तिकार अशा कलावंतांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी (कै.) बी. के. चित्रमंदीर ट्रस्टचे संचालक जयवंत नाईक उर्फ चौ, कलामहर्षि (कै.) के. बी. कुलकर्णी यांचे नातू शिरीष कुलकर्णी, मुंबई येथील चित्रकार अनिल कुबल, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, पी. के. सावंत पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोशिएनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, समितीचे सचिव व नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर तसेच इतर तहसीलदार अमोल पाठक, डाॅ. संजय सावंत, महेश परूळेकर, पत्रकार महेश सरनाईक, बाळ खडपकर, राजन नाईक, अजय सावंत, गुरू दळवी, पद्माकर वालावलकर, काशीराम गायकवाड, कलाशिक्षक संदीप साळसकर, संदीप चिऊलकर, आजगावकर, भुषण जड्ये, समीर साखळकर तसेच कला रसिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी येथील कलादालनाला के. बी. के. चित्रमंदीर आर्ट ट्रस्ट क्रिएशन ग्रुप मुंबई प्रेषित आर्किटेक्ट जयवंत कृष्णाजी नाईक (चौ), श्री. अनिल दत्तात्रय कुबल कलादालन कुडाळ असे नामकरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चौ यांचे व्यक्तिचित्र हणमशेठ यांनी अवघ्या दोन तासाच्या कालावधीत कॅनव्हासवर साकारले. श्री. कदम म्हणाले, "चित्रकला क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील मुलांना या क्षेत्रातील विविध विषयांची माहिती प्रात्यक्षिका व मार्गदर्शनाद्वारे व्हावी यासाठी श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळच्यावतीने यापुढे कार्यशाळेंचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिलीच ही व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाट हायस्कूलचे कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी विशेष सहकार्य केले."
-----------