हडपिड मठाचा 23 ला वर्धापनदिन

हडपिड मठाचा 23 ला वर्धापनदिन

Published on

swt१३२३.jpg
८८८१५
हडपिडः येथील स्वामींच्या मठातील मूर्ती.

हडपिड मठाचा २३ ला वर्धापनदिन
२२ पासून कार्यक्रमः पादुकांच्या प्रतिष्ठापनेसह सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १३ः हडपीड (ता. देवगड) येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे २३ ला स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ मठाचा चौथा वर्धापनदिन होत आहे. याचे औचित्य साधून स्वामी मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषणनंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून स्वामी मठात राज्यातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यानिमित्त २२ ते २४ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २२ ला सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा श्री देवी पावणादेवी मंदिर ते शिरगाव, निमतवाडी हडपीड पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत, सायंकाळी ८ वाजता महाराष्ट्राच्या साडेतीन देवी शक्तिपीठांचे स्वामी समर्थ मठात आगमन. २३ ला सकाळी ५ वाजता गणेश पूजन, पादुका पूजन, सकाळी ७ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,
सकाळी ९ वाजता जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना तसेच साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना, सकाळी १० लघुरुद्र, दुपारी १२ वाजता पालखी सोहळा, १२.३० वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता श्री प्रशांत पाटीदेकर यांचा सुस्वर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता देवींचा आविष्कार सखी परिवार (कोकण कट्टा), रात्री ८ वाजता महाराष्ट्राची लोकधारा इंद्रायणी ग्रुप-सावंतवाडी. २४ ला सकाळी ८ वाजता देवींची पूजा, १० वाजता कुंकुमार्चन, १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता प्रा. डॉ. यशवंतराव पाटील नाशिक यांचे व्याख्यान, सायंकाळी ५ वाजता नामस्मरण, ६ वाजता गोंधळ आणि इतर भक्तीचे कार्यक्रम होणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुका अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील गाभाऱ्यात समर्थांच्या सत्यधारणेसाठी निवासी ठेवण्यासाठी विशेष सहकार्य वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. समाधी मठात स्वामीच्या दिव्य समाधीवर या पादुकांवर सत्त्वांकित अभिषेक करण्यासाठी श्री अनु गुरुजींनी मोलाचे सहकार्य केले. हा शक्तिपीठ दर्शन सोहळा संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-जोगेश्वरी मंडळ, हडपीड स्वामी मठ गाव समिती आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या सहकार्याने होणार आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com