''शिवगर्जना'' नाट्यप्रयोगाची कुडाळात जोरदार तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शिवगर्जना'' नाट्यप्रयोगाची 
कुडाळात जोरदार तयारी
''शिवगर्जना'' नाट्यप्रयोगाची कुडाळात जोरदार तयारी

''शिवगर्जना'' नाट्यप्रयोगाची कुडाळात जोरदार तयारी

sakal_logo
By

88856
कुडाळः येथे होणाऱ्या ''शिवगर्जना'' या नाट्यप्रयोगासाठी भव्य रंगमंचाचे काम सुरू आहे. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘शिवगर्जना’ची कुडाळात जोरदार तयारी
रंगमंचाचे काम सुरूः भाजपचे पदाधिकारी सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः येथे भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता. १७) होणाऱ्या ''शिवगर्जना'' या नाट्यप्रयोगाची जोरदार तयारी येथील एसटी डेपोच्या मैदानावर सुरू आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अनेक नेते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता हा भव्य नाट्य सोहळा होणार आहे. भाजपा सिंधुदुर्ग आणि विशाल सेवा फाउंडेशन यांच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या नाट्यप्रयोगाचा कोकणातला हा पहिला प्रयोग आहे. या नाट्यप्रयोगात सातशे कलाकार सहभागी होणार आहेत. तर हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी असा लावाजमा थेट रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. तसेच शिवकाळातील अनेक प्रयोग यानिमित्ताने भव्य रंगमंचावर दाखविले जाणार आहेत. यात शिवराज्याभिषेक, अफजलखान वध यांसह अनेक ऐतिहासिक प्रसंग दाखविले जाणार आहेत. या नाट्यप्रयोगात काही स्थानिक कलाकारांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. येथे होणाऱ्या नाटकासाठी भव्य रंगमंचाची तयारी सध्या कुडाळ डेपोच्या मैदानावर सुरू आहे. सुमारे पन्नास हजार प्रेक्षक पहिल्या दिवशी या नाट्यप्रयोगाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या पलीकडच्या ग्राउंडवर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर व्हीआयपी गाड्यांची पार्किंग व्यवस्था कुडाळ डेपोमध्ये करण्यात आली आहे.
१७ आणि १८ मार्च असे दोन दिवस हा नाट्यप्रयोग होणार असल्याने जिल्ह्यात एक लाख प्रवेशिका सध्या वितरित करण्यात आल्या आहेत. ज्यांना प्रवेशिका हव्या असतील, त्यांनी भाजप कार्यालयात तसेच भाजपा पदाधिकारी व नेत्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशाल सेवा फाउंडेशनच्या सावंतवाडी कार्यालयातही प्रवेशिका उपलब्ध आहेत, अशी माहिती परब यांनी दिली. नाटकात शिवजन्मासह बाराव्या शतकापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे सर्व प्रसंग दाखविले जाणार आहेत. पाच मजली भव्य असा फिरता रंगमंच असणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष परब यांनी केले आहे.

चौकट
राणेंच्या वाढदिवस सोहळ्याकडे लक्ष
विशाल सेवा फाउंडेशन आणि भाजपच्यावतीने आयोजित नाट्यप्रयोगाआधी भाजपचे युवा नेते नीलेश राणे यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवस सोहळ्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार नीतेश राणेंसह राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. नीलेश राणेंचा वाढदिवसही भव्य स्वरुपात साजरा करण्याचे विशाल सेवा फाउंडेशन व भाजपने ठरविले आहे. त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.