
कुडाळ आगारप्रमुख पदासाठी युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
swt1326.jpg
88846
योगेश धुरी
कुडाळ आगारप्रमुख पदासाठी
युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
माणगाव, ता. १३ः येत्या आठ दिवसांत कुडाळ आगारप्रमुख नेमा; अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करू, असे इशारा युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे. कुडाळ आगारप्रमुख हे पद गेले कित्येक दिवस रिक्त आहे. या संदर्भात निवेदन दिले; मात्र अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. आगारात गाड्या बंद राहण्याचे प्रमाण जास्त आहे. बस कमतरतेमुळे एसटी वेळेत न सुटणे, मुलांच्या पासासंदर्भात अडचणी येत आहेत. आगारप्रमुखच नाही तर हे प्रश्न मांडायचे कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होतो. येथील आगारामध्ये दोन वाहतूक निरीक्षक दिले आहेत; मात्र त्यांची काहीही गरज नाही. आगारप्रमुखासह एक वाहतूक निरीक्षक चालला असता. एसटी विभागाने येत्या आठ दिवसांत आगारप्रमुख नेमावा; अन्यथा युवासेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे धुरी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. यावेळी तालुका समन्वयक योगेश तावडे, चिटणीस तानाजी पालव, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शहर समन्वयक अमित राणे आदी उपस्थित होते.
....................
swt1327.jpg
88847
कुडाळः युवक काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष आफ्रिन करोल यांचे अभिनंदन करण्यात आले.
कुडाळ नगराध्यक्षांना काँग्रेसतर्फे शुभेच्छा
मालवण : कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांच्या वर्षपूर्तीबद्दल तसेच कुडाळ शहरातील नियोजनासाठी घेतलेल्या उत्तम निर्णयासाठी कुडाळ-मालवणमधील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत त्यांचे कुडाळ येथे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कुडाळ नगरपंचायत हद्दीत झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्त्या, सांडपाणी-कचरा नियोजन, गार्डन व्यवस्था, मार्केट विस्तार याबाबत सविस्तर चर्चा केली. भविष्यात होऊ घातलेल्या मालवण पालिका निवडणुकीमध्ये देखील उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन मार्गदर्शन करू, असे नगराध्यक्ष करोल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी खानोलकर उपस्थित होत्या.