वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी महिलांचा संवाद

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी महिलांचा संवाद

88882
असलदे : येथील दिविजा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसमवेत समर्थ प्लाझा महिला समुहाने महिला दिन साजरा केला.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी महिलांचा संवाद

विविध साहित्य भेट; देवगडमधील महिला समुहाचा उपक्रम

देवगड, ता. १३ ः येथील समर्थ प्लाझा निवासी संकुलातील महिला समुहातर्फे महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी तेथील ज्येष्ठ नागरिकांशी महिलांनी संवाद साधत त्यांचे मनोरंजन केले. यानिमित्त घेतलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत अनुष्का शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
येथील समर्थ प्लाझा निवासी संकुलातील महिला समुहाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या महिला समुहाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक साहित्य दिले. यावेळी नगरसेविका रुचाली पाटकर, अमिता तावडे, सुप्रिया गावकर, सई भाबल, संगीता सावळे, रेणुश्री पाटील, सुवर्णा पाटील, वर्षा घोडे, रुपाली लवटे आदी उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत दिविजा वृद्धाश्रमाचे संदेश शेटये यांनी केले. महिलांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधला. महिलांनी हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण करून ज्येष्ठांचे मनोरंजन केले. तसेच समर्थ प्लाझा निवासी संकुलात आयोजित कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी व्यासपीठावर सई भाबल, सुप्रिया गावकर, मृणाल केळकर, अमिता तावडे, नगरसेविका रुचाली पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुवर्णा पाटील, तृतीय क्रमांक हेमा जेठे यांनी मिळविला. विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिक्षक मधुसुदन घोडे, शिक्षक अशोक शिंदे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रमही झाले. ईश्वरी पडवळ, मीरा जामसंडेकर, अस्मी सहस्त्रबुद्धे यांनी नृत्य सादर केले. अभिनव शिंदे याने गीत गायन केले. दीपाली राऊत व स्वरा या माय-लेकींनी सादर केलेल्या नृत्यालाही उपस्थितांची दाद मिळाली. हिमानी घोडे हिने सूत्रसंचालन केले. यावेळी मानसी गिरकर, सुप्रिया तारी, समृद्धी पडवळ, प्रियांका बांदिवडेकर, प्रियांका शिंदे, अनिता चव्हाण, मांगीदेवी रायका आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. केतकी जामसंडेकर यांनी सदिच्छा भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com