काळसेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

काळसेतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

Published on

काळसेतील शेतकऱ्यांना उद्या भरपाई
मालवण : तालुक्यातील काळसे-बागवाडी येथील शेतकऱ्यांचे २०१९ या वर्षी अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे होऊनही कोणतीही मदत मागील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तत्काळ निधीची तरतूद करण्यात आली आहे. ३८ शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या (ता. १४) ३ लाख ७० हजार नुकसान भरपाई मदतनिधी जमा होणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी दिली.
माजी खासदार राणे यांनी आज तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. काळसे-बागवाडी नुकसानग्रस्त शेतकरीही यावेळी उपस्थित होते. शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्धता झाली आहे. उद्यापासून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई मदत निधी जमा केला जाईल, असे तहसीलदार यांनी यावेळी सांगितले. याबाबत ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत भाजप युती सरकार व नीलेश राणे यांचे आभार मानले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, महेश मांजरेकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, आबा हडकर, आशिष हडकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर, भाई मांजरेकर यांसह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, "२०१९ मध्ये काळसे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मधले सरकार कोणाचे होते यावर बोलणार नाही; मात्र शिंदे-फडणवीस सरकार आले आणि ३८ शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईपोटी रखडलेले पैसे मंजूर झाले. आज सर्व शेतकरी आले होते. तहसीलदारांनी शासनाने पाठवलेले पैसे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे. या सरकारमध्ये तातडीने कामे होतात, याचे हे तत्पर उदाहरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो."
विजय कुडाळकर, कृष्णा माडये, सत्यवान कुडाळकर, लक्ष्मण जावकर, स्नेहलता सावंत, विश्वंभर माडये, प्रतीक्षा सावंत, विश्वंभर माडये, सुप्रिया माडये, अनिल पावसकर, सुलोचना पावसकर, सत्यवती माडये (रमेश शांताराम कुडाळकर), मृत वीणा कुडाळकर, सत्यवान काळसेकर, सविता खोत, प्रभाकर खोत, सत्यविजय परब, कल्याणी परब, ताराबाई खोत, अंकिता कुडाळकर, मालिनी पावसकर, देविदास केळजी, दमयंती मांजरेकर, संतोष माड्ये, रमेश माडये, रामचंद्र खोत, अरविंद खोत, अभिषेक हेरेकर, विजया माड, दर्शना माडये, शंकर नार्वेकर, उषा माडये, चंद्रभागा शेलटे, सुनील पावसकर, अर्चना माडये, शैला पावसकर, धोंडी धुरी, दशरथ नार्वेकर, कैलास माड्ये, अनिता कुडाळकर, सावित्री नाईक, प्रतीक्षा माडये, अनुराधा माड्ये आदींचे लाखो रुपये नुकसान झाले होते. या सर्वांना ३ लाख ७० हजार मदतनिधी उपलब्ध झाला आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com