
कर्मचाऱ्यांच्या संपास सावंतवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी ः येथील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.
टीपः swt१४३०.jpg मध्ये फोटो आहे.
कर्मचाऱ्यांच्या संपास
सावंतवाडीत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीच्या दराने पेन्शन लागू करावी, यासाठी आज सर्व शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले. येथील पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी घेतला. कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या गेटजवळ एकत्र येत आंदोलन पुकारले. ''जुनी पेन्शन योजना लागू करा'' अशा घोषणा देण्यात आल्या. कर्मचारी वर्ग संपात सहभागी झाल्याने पालिकेचे सर्व कामकाज ठप्प होते. येथील तहसील, प्रांताधिकारी कार्यालयासह सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाले. तालुक्यात या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कामकाजही ठप्प होते. तर ग्रामीण भागातील व शहरातील बहुतांश शाळा बंद होत्या. शहरातील काही शाळा तसेच खासगी शाळांमधील शिक्षक संपात सहभागी झाले नसल्याने त्या शाळा सुरू होत्या. महाविद्यालयांतील शिक्षक वर्गानेही संपात सहभाग घेतला. काही शाळांतील विद्यार्थी शाळेत आले होते; मात्र शिक्षक संपात सहभागी झाल्याने ते घरी परतले. शासकीय कामे खोळंबल्याने अनेकांची गैरसोय झाली.