सरवणकरांच्या मुंबईतील खोल्या आगीत जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवणकरांच्या मुंबईतील खोल्या आगीत जळून खाक
सरवणकरांच्या मुंबईतील खोल्या आगीत जळून खाक

सरवणकरांच्या मुंबईतील खोल्या आगीत जळून खाक

sakal_logo
By

rat१४८.txt

बातमी क्र.. ८ (पान ५ साठी)
-----------

- rat१४p४२.jpg, rat१४p४३.jpg -
८९०२२, ८९०२३
मुंबई ः मालाड येथे भीषण आगीत झोपडपट्टी खाक झालेल्या प्रभाकर व दत्ताराम सरवणकर यांच्या खोल्या.

सरवणकरांच्या मुंबईतील खोल्या आगीत जळून खाक

संसार उघड्यावर ः आर्थिक व मानसिक आधाराची गरज

राजापूर, ता. १४ ः मुंबई मालाड येथे झालेल्या झोपडपट्टीमधील भीषण आगीमध्ये राजापूर तालुक्यातील आंगले सरवणकरवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रभाकर व दत्ताराम सरवणकर यांच्या खोल्याही जळून खाक झाल्या. त्यांच्या अंगावरील कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
मुंबई मालाड आप्पापाडा येथील झोपडपट्टीमध्ये रविवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागून सुमारे यामध्ये ३ हजार ५०० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. ही आग सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका खोलीला लागलेल्या आगीने हा हा म्हणता रौद्ररूप धारण केले. यामध्ये साडेतीन हजार कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. यामध्ये तालुक्यातील प्रभाकर सखाराम सरवणकर व दत्ताराम सखाराम सरवणकर या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. त्यांच्या घरामधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. दोघांनाही प्रत्येकी दोन मुले असून त्यांना पत्नी व मुलांसह रस्त्यावर यावे लागले आहे.
प्रभाकर सरवणकर यांची रात्रपाळी असल्याने सांयकाळी ५ वा. दरम्यान झोपून उठले होते. त्याच दरम्यान एक महिला आग आग म्हणून ओरडत धावत आली. या वेळी प्रभाकर यांनी बाहेर येऊन पाहताच नजीकच्या घराला आग लागली होती. ही आग बघता बघता इतर घरांना लागली असल्याने व नजीकच्या घरामध्ये आग लागलेली पाहून दोघा बंधूंनी प्रथम मुलांना व पत्नीला घेऊन बाहेर धाव घेतली.
आगीने रौद्ररूप धारण केलेले असल्याने त्यांना घरातील कोणतीही वस्तू बाहेर काढता आली नाही. त्यामध्ये झोपडीपट्टीवजा घरे असल्याने काही कालावधीमध्येच सर्वच परिसरात आग पसरली होती. परिणामी, रस्त्यावर उभे राहून हताशपणे जळणाऱ्या घराकडे पाहण्याशिवाय त्याकडे काही राहिले नाही. या वेळी दोघे भाऊ अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडले. यामुळे त्यांच्याकडे असलेले पैसे, दागिनेसहित घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. त्यांना सध्या आर्थिक व मानसिक आधाराची गरज असून त्या दोघांना मदत करावी, असे आवाहन आंगलेवासियांच्यावतीने सरपंच श्रीधर सौंदळकर यांनी केले.