हौशी रंगकर्मीच्या हृदयविकार उपचारांसाठी मंत्री

हौशी रंगकर्मीच्या हृदयविकार उपचारांसाठी मंत्री

rat१४५४.txt

रंगकर्मीच्या उपचारासाठी मंत्री सामंत यांची मदत

रत्नागिरी, ता. १५ ः रत्नागिरीतील एका हौशी रंगकर्मीच्या हृदयविकारावरील उपचारांसाठी नाट्यप्रेमी व सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय असलेले उद्योगमंत्री उदय सामंत धावले आहेत. अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष असलेल्या सामंत यांनी तातडीने आर्थिक मदतीचा हात दिल्याने पुढील उपचारास मदत झाली. यामुळे नाट्यकर्मींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. कोणताही गाजावाजा न करता त्यांनी ही मदत केली.
रत्नागिरीतील अनेक हौशी रंगकर्मीपैकी संतोष उर्फ छोटू दामले हा युवा कलाकार. त्याच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्याकरिता पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च आवाक्याबाहेरचा होता; पण त्याच्या मित्रमंडळी, नाट्यसंस्थांनी खारीचा वाटा उचलायचा ठरवले. कलाकार हेरंब जोगळेकर, वामन जोग, श्रीनिवास जोशी, गणेश जोशी, कैलास खरे, निखिल रानडे, श्रीधर पाटणकर, व्यावसायिक अनंत आगाशे आणि पुरोहित बावा पाटणकर यांनी मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला अनेकांनी चांगला प्रतिसाद देत रक्कम उभी करण्यास सुरवात केली. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांच्या कानावर जाताच त्यांनी संतोष दामले या हौशी रंगकर्मीसाठी तत्काळ आर्थिक मदत पोहोच केली. राज्यकर्ते म्हणून जनतेचे प्रश्न सोडवताना अतिशय तत्पर असणारे सामंत हे गेली अनेक वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे विश्वस्त आणि रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत. सर्वसामान्यांपासून मोठ्या कलाकारांना ते नेहमी सोबत घेऊन जातात. नाट्यप्रेमी व कलाकार असल्याने केवळ प्रेमापोटी त्यांनी ही तातडीची मदत केली. याबद्दल रत्नागिरीतील रंगकर्मी, कलाकारांनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com