
नाटक
नाटकाचा मुखवटा टाकणे..
रत्नागिरीचे ''राखेतून उडाला मोर'' प्रथम
राज्य बालनाट्य अंतिम स्पर्धा : राखेतून ला चार पारितोषिकं
रत्नागिरी : १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीतील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल या संस्थेच्या '' राखेतून उडाला मोर'' या नाटकाला प्रथम पारितोषिक, शिव रणभूमी प्रतिष्ठान सेवा संस्था, ऐरोली, नवी मुंबई या संस्थेच्या ''तळमळ एका अडगळीची '' या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रज, पुणे या संस्थेच्या ''बळी'' या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
अंतिम फेरीचे प्रथम तीन क्रमांचे निकाल असा : दिग्दर्शन: प्रशांत निगडे (नाटक-तळमळ एका अडगळीची), संतोष गार्डी (राखेतून उडाला मोर), मुग्धा बडके ( बळी). नाटयलेखन ः संध्या कुलकर्णी (बळी), संकेत तांडेल (अजब लोठयांची महान गोष्ट).
प्रकाश योजना ः साईप्रसाद शिर्सेकर (राखेतून उडाला मोर), विनोद राठोड (ध्येयधुंद).
नेपथ्य ः मुकुंद लोखंडे (गोष्टींची स्टोरी), प्रविण धुमक (नाटक- राखेतून उडाला मोर).
संगीत दिग्दर्शक ः निखील भुते (राखेतून उडाला मोर), ओंकार तेली (तळमळ एका अडगळीची).
वेशभूषा ः वर्षा लोखंडे (गोष्टीची स्टोरी ) विरोशा नाईक (तळमळ एका अडगळीची).
रंगभूषाः निलम चव्हाण (तळमळ एका अडगळीची), वर्षा लोखंडे (गोष्टींची स्टोरी). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष नीरज हुलजुते (काश्मिर स्माईल ) अर्जुन झंडे तळमळ एका अडगळीची), आयन बोलीज (बदला), सोहम पानवंद (गुहेतील पाखरं), प्रणीत जाधव (हलगी सम्राट), उत्कृष्ट अभिनय रोप्यपदक स्त्री- गायत्री रोहकले (अजब लोठयांची महान गोष्ट), सायुरी देशपांडे (ध्येयधुंद), स्वराली तोडकर (या चिमण्यांनो परत फिरा रे), अस्मी गोगटे (बळी), आर्या रायते ( गोष्टीची स्टोरी) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे आर्या देखणे (अजब लोठयांची महान गोष्ट), शर्वरी पवार ( यम्मी मम्मी, उम्मी), कृपा म्हात्रे (रेस २) तेजस्विनी टक्कर (खिडकी), आस्था सोनी (काश्मिर स्माइल), मानस तोंडवळकर (तळमळ एका अडगळीची) श्लोक नेरकर (बदला), राजीव गानू (ध्येयधुंद).