न्हावेली-रेवटेवाडीत रस्ताकामास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावेली-रेवटेवाडीत रस्ताकामास प्रारंभ
न्हावेली-रेवटेवाडीत रस्ताकामास प्रारंभ

न्हावेली-रेवटेवाडीत रस्ताकामास प्रारंभ

sakal_logo
By

89213
न्हावेली : येथील भोमवाडी ते रेवटेवाडी रस्ताकामाचा प्रारंभ करताना राजन तेली, अंकित धाऊसकर, संतोष नाईक, प्रमोद गावडे, हेमंत मराठे आदी.

न्हावेली-रेवटेवाडीत रस्ताकामास प्रारंभ
सावंतवाडी ः न्हावेली-रेवटेवाडी ते भोमवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचा प्रारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच अंकित धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, सदस्य अक्षय पार्सेकर, आरती माळकर, प्रमोद गावडे, प्रसाद गावडे, राज धवन, समीर पार्सेकर, सुदन पार्सेकर, योगेश पार्सेकर, नितीन पालयेकर, राजन कालवणकर, हेमचंद्र सावळ, संजय दळवी, भिवा नाईक, सुनील धाऊसकर, भैया नाईक, शैलेश भगत, एकनाथ परब, संतोष फणसेकर, गीतेश परब, माजी सरपंच प्रतिभा गावडे, धोंडू परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कित्येक वर्षांपासून या रस्त्यासाठी ग्रामस्थांची मागणी होती. अखेर पालकमंत्री निधीतून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
.................
रेडीत काजू कलमे जळून खाक
सावंतवाडी ः रेडी-बोमडोजीचीवाडी येथील नरेश खेडेकर यांच्या काजूच्या झाडांना अचानक आग लागली. या आगीत दहा काजूची झाडे जळून गेली. ही घटना शक्रवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून ही आग अटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. अज्ञाताने आग लावली असल्याचा संशय खेडेकर यांनी व्यक्त केला. ऐन काजूच्या हंगामात आंबा-काजू बागांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.