रक्त पिशवी दरवाढ स्थगित करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्त पिशवी दरवाढ स्थगित करा
रक्त पिशवी दरवाढ स्थगित करा

रक्त पिशवी दरवाढ स्थगित करा

sakal_logo
By

89263
मालवण ः रक्ताचे वाढीव दर कमी करण्याबाबतचे निवेदन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

रक्त पिशवी दरवाढ स्थगित करा

मालवणात निवेदन; ‘सिंधू रक्तमित्र’चा पुढाकार

मालवण, ता. १५ : रक्त पिशवी किंमत वाढप्रश्नी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक भावनेतून राज्याचे लक्ष वेधले. वाढीव दरवाढ स्थगित करावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी राज्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या व रक्ताची गरज लागणाऱ्या सर्व रुग्णांना आता रक्त पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. हे निश्चितच स्वागतार्ह्य आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना हा निश्चितच मोठा दिलासा मिळेल; मात्र याचवेळी दुसरा निर्णय असा घेतला आहे की, खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्त पिशवी ४५० रुपयांवरून ११०० रुपये इतकी दरवाढ केली आहे. अनेकवेळा काही सेवा शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत. अशावेळी खासगी रुग्णालयातच नाईलाजाने रुग्णांवर उपचार केले जातात. जर रक्ताची गरज लागली तर या सुधारीत दराने सामान्य व गरीब रुग्णास रक्त घ्यावे लागेल; परंतु निश्चितच खासगी रुग्णालयात जाणाऱ्या सामान्य व गरीब रुग्णांना ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे ही नवीन दरवाढ रद्द करुन जुन्या धोरणाप्रमाणेच ती ४५० रुपये, अशी ठेवावी, अशी मागणी केली आहे. खेड्यापाड्यातील सामान्य व गरीब जनता नाईलाजाने किंवा अपरिहार्यपणे खासगीत उपचार घेत आहे. रक्ताचे शुल्क वाढविल्यामुळे हा अधिकचा भुर्दंड या जनतेस पडणार आहे. त्यामुळे या बाबीकडे संवेदनशीलतेने शासनाचा लक्षवेध करावा. सुधारीत वाढीव सेवाशुल्काबाबत स्थगिती देऊन ती खासगीकरिता पूर्ववत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानने केली आहे. हे निवेदन राज्यशासन प्रशासकीय प्रतिनिधी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, तालुका उपाध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक, हर्षदा पडवळ, साक्षी मयेकर, आर्या गावकर, शांती तोंडवळकर उपस्थित होते.