राजापूर तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा
राजापूर तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

राजापूर तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

rat१५१५.txt

- rat१५p८.jpg ः
८९२०२
राजापूर ः क्रीडासंकूल उभारण्यात येणारा परिसर.

राजापूर तालुका क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा

प्रशासकीय मान्यता ः ४ कोटी ९८ लाख सुधारित आराखडा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः प्रलंबित असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाकरिता सुधारित अंदाजपत्रक व आराखड्याला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न केले. रायपाटण येथे उभारण्यात येणाऱ्‍या तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाकरिता ४ कोटी ९८ लाख ३० हजार रुपयांच्या सुधारित आराखडा मंजूर झाला. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने पुढील महिन्यात तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याचा निर्णय क्रीडा संकूल समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

राजापूर तहसीलदार यांच्या कार्यालयात क्रीडा संकूल समितीची बैठक अध्यक्ष आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे, नायब तहसीलदार राकेश गिड्डे, मनोहर खापणे महाविद्यालयाचे प्रतिनिधी नरेश पाचलकर उपस्थित होते. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता व कौशल्य आहे. पुरेशा आणि आवश्यक सोयी सुविधांअभावी खेळाडूंना म्हणावी तशी प्रगती साधता येत नाही. अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडाप्रकार आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा सुयोग्य वापर करून यश मिळवले आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला अधिक चालना देण्यासाठी तालुक्यामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी व्हावी अशी मागणी तालुकावासियांकडून केली जात आहे. आमदार साळवींनीही शासनस्तरावर प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याला यश आले आहे.
या संकुलाचे सुमारे ५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यापैकी एक कोटीचा निधी उपलब्ध आहे. उर्वरित चार कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवण्यात येणार आहे. तसेच ६० लाख रुपयांसाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्धततेसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडे वर्ग झालेल्या एक कोटी निधीतून क्रीडा संकुलाच्या कामाला सुरवात करण्यात येणार आहे. त्यात चारशे मीटर रनिंग ट्रक, प्रत्येकी दोन कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल मैदाने तसेच एक लांब उडी मैदान उभारण्यात येणार असल्याची माहितीही साळवी यांनी या वेळी दिली.

सर्व खेळांच्या सुविधा
तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक जागा रायपाटण येथील सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळ (पाचल, राजापूर) या संस्थेने सामंजस्य कराराद्वारे दिली आहे. या संकुलामध्ये ४०० मीटर धावनपथ, प्रशासकीय इमारत व इनडोअर गेम हॉल, व्यायामशाळा, खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल मैदाने, बास्केटबॉल कोर्ट आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या सुविधांच्या उभारणीसह या ठिकाणी करण्यात येणारे विद्युतीकरण, पाणीपुरवठा, ड्रेनेजअंतर्गत रस्ते, तारेचे कुंपण व क्रीडासाहित्य आदी सोयीसुविधांच्या उभारणीचा खर्च नव्या अंदाजपत्रक आणि आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.