-नागरी बँकांत समावेश करा

-नागरी बँकांत समावेश करा

बातमी क्र.. २७

विमुक्त जाती महामंडळ योजनांना
नागरी बँकेतून कर्ज द्या

प्रवीण काकडे ; सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी आवश्यक

रत्नागिरी, ता. १५ ः वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने विविध कर्ज योजना, व्याज परतावा योजना, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत. महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक आहे. या योजनेचा सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
काकडे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच व्याज परतावा योजनेचा फायदा होतो; परंतु राष्ट्रीयीकृत बँकेकडून बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे बहुतांशी वेळा मंजूर केली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व सुशिक्षित बेरोजगार यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. विविध जाती जमातीतील समाजबांधवांसाठी प्रत्येक जातीनुसार महामंडळे निर्माण करून विकास करण्यासाठी तयार केली आहेत; परंतु जेवढी आश्वासने दिली आहेत तेवढी प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत, अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नोकरीचा प्रश्न युवकांच्या पुढे गंभीर आहे.
राज्य शासनाने ज्या काही विविध जाती-जमातीतील युवा उद्योजकांच्या बाबतीमध्ये योजना आणल्या आहेत त्याबाबत राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरी सहकारी बँकांचा समावेश करून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी उपलब्ध होतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची व्याज परतावा योजना राष्ट्रीयकृत बँकेबरोबर व इतर इतर बँकेलासुद्धा लागू आहे. त्याच धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजना राष्ट्रीय कृत बँकेसोबत व इतर बँकांनासुद्धा ही योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com